आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४

सिटीझन वेलफेअर असोशिएशनच्या वतीने बदलापूर येथील कवठेवाडी आदिवासी पाड्यावर फराळ व कपडे वाटप

बदलापूर( गुरुनाथ तिरपणकर)सिटीझन वेलफेअर असोशिएशन नेहमीच बदलापूर येथील विविध नागरी समस्यांसाठी प्रशासनाशी झगडत असते.काही समस्या सततच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वासही गेल्या.आदिवासी पाड्यांवरीलही समस्या सोडविण्यासाठी असोशिएशन प्रयत्नशील आहे.याच आदिवासी पाड्यावरील आदिवासींची दिवाळी गोड करण्याकरिता सिटीझन वेलफेअर असोशिएशनच्या वतीने बदलापूर येथील कवठेवाडी आदिवासी पाड्यावर दिवाळी पहाटचे औचित्य साधून सकाळी कपडे व फराळ वाटप करण्यात आले.बदलापूर जवळच्या आदिवासी पाड्यांमध्ये आजही अनेक समस्या आहेत.अत्यंत मूलभूत मानल्या जाणा-या समस्या आजही संपल्या नाहीत.स्वच्छ पिण्याचे पाणी किंवा आवश्यक एवढी वीज अजूनही या पिढ्यांपर्यंत पोहोचली नाही.जगण्यासाठी संघर्ष करणा-या या आदिवासीं बंधू-भगिनींच्या जीवनात दिवाळीच्या निमित्ताने आनंदाचा दिवस साजरा व्हावा या उद्देशाने दरवर्षी असोशिएशनच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित केले जातात.दरवर्षीप्रमाणे यावर्षीची दिवाळीही आदिवासी बांधवांसोबत करावी यासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थापक सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.या उपक्रमासाठी सचिव राजेंद्र नरसाळे,संस्थापक सदस्य दिलीप नारकर,सौ.सुवर्णा इस्वलकर,विलास साळगावकर,चंद्रकांत चिले,सेवा निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप शिरसाट,डाॅ.अमितकुमार गोविलकर,विलास हंकारे,महेश सावंत,गुरुनाथ तिरपणकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन ;संजय,अजय,आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर

मुंबई (प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व.हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित...