निळजे ( प्रतिनिधी) डोंबिवली गावातील संगीत भजन परंपरेचे जतन व्हावे, कला साहित्याचे संवर्धन करता यावे व दिवाळीचा आनंद द्विगुणीत व्हावा. या हेतूने सालाबाद प्रमाणे दिवाळी पहाट निळजे २०२४ या विशेष संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कलामन सेवा संस्था आणि ग्रामस्थ मंडळ निळजे यांच्या सहयोगातून सलग बारा वर्ष भजन स्पर्धा व दिवाळी पहाट ह्या कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने यावर्षी तपपूर्ती सोहळ्याचे स्वरूप प्राप्त होणार आहे.यावर्षी गायक श्री वैभव कडू नवी मुंबई, कुमारी भक्ती पवार जालना यांच्या सुस्वरांनी आपण नक्कीच मंत्रमुग्ध होऊ.
तसेच मागील काही वर्षा पासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून गायक गणेश गोंधळी पनवेल, संदीप कडू उरण, ज्ञानेश्वर मेश्राम आळंदी, अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड अहमदनगर, जगदीश चव्हाण नाशिक, अशा दिग्गज टीव्ही स्टार कलाकारांनी आपली कला सादर करून रसिकांची मने जिंकली आहेत. कलामन सेवा संस्थेचे पदाधिकारी मच्छिंद्र पाटील, बाबुराव पाटील, सुनील पाटील, कवी किरण पाटील, जयदास खंडाळे, किरण बा.पाटील व राजेंद्र पाटील तसेच ( ह.भ.प. वै. सोमनाथ बुवा पाटील) यांच्या प्रयत्नाने व ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्य व उपस्थितीने हा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडत असतो. तसेच ह भ प श्री शरद महाराज पाटील यांची मार्गदर्शक सूत्रसंचालक, निवेदक म्हणून मोलाची भूमिका असते. हा कार्यक्रम निसर्गरम्य माऊली तलावाच्या परिसरातील श्री वेताळेश्वर मंदिराच्या प्रांगणात संपन्न होत असतो. तरी सर्व रसिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा