'माता सरस्वती देवी '
नवरात्रौत्सव दिनी
नमस्कार मी करतो
माता सरस्वती देवी
नित्य तूज मी स्मरतो..१
बुध्दि,ज्ञान नि वाणीची
असे देवता शारदा
वाक,वाणी,गीरा,भाषा
वागीश्वरी तू सर्वदा..२
कार्य तुझे निरंतर
विश्व निर्मिती करते
सोमलता, ब्राह्मी तूच
कृपादृष्टी ही लाभते..३
मिळे सुखाची देणगी
करे संतुष्ट वाग्देवी
रूप शोभते श्रीश्वरी
लक्ष्य मजवरी ठेवी..४
सरस्वती पूजा असे
माघ मासी शुक्ल पक्षी
दिन वसंतपंचमी
निष्ठावंत भक्त रक्षी..५
कन्या तू ब्रह्मदेवाची
देवी शुभ्रवस्त्रधारी
पत्नी शोभते अश्विनी
कुमाराची, वीणाधारी..६
बौध्द आणि जैन धर्म
दोन्ही देवीस पूजती
आर्यवजा, वजवीणा
करी स्तुती सरस्वती..७
--------------------------------
✍️नवनाथ ठाकुर-खिडकाळी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा