'तुळजापूरची भवानी'
जिल्हा हा उस्मानाबाद
गाव हे तुळजापूर
तुळजाभवानी स्थान
तिचा महिमा अपार..१
देवी तुळजाभवानी
कुल स्वामिनी ही माता
छत्रपती शिवाजींची
शोभे ही कुलदेवता..२
आशिर्वाद देवीचा हा
स्वराज्याच्या स्थापनेला
भवानीने तलवार
भेट दिली शिवबाला..३
साडे तीन पीठांपैकी
आदिशक्ति मूळस्थान
वास्तु ती हेमांडपंथी
होई तिचा हो सन्मान..४
देवी भागवतात या
तुळजापूरचा लेख
अस्य कुलदेवता ही
महाराष्ट्र , कर्नाटक..५
गर्भगृहातील देवी
महिषासूरमर्दिनी!!!
अष्टभूजा रूप तुझे
शोभे 'विश्वविनोदिनी'..६
बाण, धनुष्य, त्रिशूळ
शंख, चक्र, तलवार
पानपत्र गदा धारी
भाता असे पाठीवर..७
--------------------------------
✍️नवनाथ ठाकुर-खिडकाळी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा