आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

शरद नगर मधील रहिवासी महिलांना शरद पाटील यांच्याकडून भाऊबीज भेट

ठाणे : 'आम्ही संस्कृती - जपतो आम्ही परंपरा पाळतो ' हे घोषवाक्य असलेल्या वाडा तालुक्यातील शरद नगर मध्ये दरवर्षी सामूहिक भाऊबीज सोहळा संपन्न होतो. या नगराचे संस्थापक व बिल्डर शरद यशवंत पाटील हे नगरातील सर्व रहिवासी महिलांना भाऊबीज करून साडी भेट देतात. शरद नगर ची स्थापना झाल्यापासून दरवर्षी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावर्षीही नगरातील जय जिजाऊ महिला मंडळाने भाऊबीज सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
   नगर उभारणारा बिल्डर व नगरात राहणारे रहिवासी यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध असल्याने असे उपक्रम नियमित साजरे होतात. " बिल्डरची भाऊबीज " या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वप्नपूर्ती गणपती बाप्पा मंदिरामध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यास प्रतिमा आगिवले , श्रद्धा पाटील , विराज पाटील , शुभम पाटील , राम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन ;संजय,अजय,आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर

मुंबई (प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व.हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित...