आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

पत्रकार राजेंद्र घरत यांचे सव्विसावे ब्रेल पुस्तक ‘जत्रांचे दिवस' प्रकाशित

पनवेल : पनवेल मधील शांतिवन-नेरे येथे असणाऱ्या कुष्ठरोग निवारण समिती केंद्राच्या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी सभागृहात युथ कौन्सिल, नेरुळ व गजानन महाराज भक्त मंडळ, वाशी यांच्या संयु्‌क्त विद्यमाने २७ ऑवटोबर रोजी आयोजित कार्यक्रमात पत्रकार राजेंद्र घरत यांच्या ‘जत्रांचे दिवस' या ब्रेल लिपीतील सव्विसाव्या पुस्तकाचे प्रकाशन शिव व्याख्याते व ‘कविता डॉट कॉम'चे निर्मिती सूत्रधार प्रा. रविंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विचारमंचावर अक्षरसुलेखनकार विलास समेळ, गजानन महाराज भक्त मंडळाचे शिवाजी शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघ-नेरूळचे आर्थिक सल्लागार विकास साठे, युथ कौन्सिल-नेरुळचे सचिव सुभाष हांडेदेशमुख, रमेश सुर्वे उपस्थित होते.
     
जत्रा आणि यात्रा यातील फरक, आबालवृध्दांना जत्रांनी दिलेला आनंद, त्यानिमित्त खेडेगावात जत्राकाळात मांडलेल्या दुकानांनी उभे केलेले मॉलसदृश्य वातावरण याचे साद्यंत वर्णन या पुस्तकात घरत यांनी केल्याचे सांगून यावेळी प्रा. पाटील म्हणाले की जुन्या काळी लोक आपल्या मातीला धरुन असत. कारण त्यांची नाळ मातीत पुरलेली असे. मात्र अलिकडच्या काळात लोकांचे मुळ गावाशी, आपल्या जुन्या घराशी, गावातील माणसांशी असलेले नातेसंबंध विरळ होत गेले असून शहरातून गावी जाणारी माणसे गावकऱ्यांची भेट टाळून थेट गावच्या घरातच शिरतात हे दुःखदायक आहे. हल्ली बाळाच्या जन्मानंतर त्याची नाळ ‘बायोवेस्ट' म्हणून कचऱ्यात फेकली जात असल्याने नव्या पिढीचे आपल्या मातीशी नाते दुरावत गेले की काय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुस्तकाचे लेखक राजेंद्र घरत यांनी जत्रांचा आनंद तुम्ही आम्ही डोळस लोक तेथे जाऊन घेतो; नेत्रहीनांना ती मौज कशी घेता येणार? म्हणून त्या जत्रांचे, यात्रांचे वर्णन ब्रेल लिपीत करुन त्यांना ते स्पर्शाने तरी वाचता यावे म्हणून हे पुस्तक आणल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष हांडे देशमुख यांनी केले. यावेळी या दोन्ही समाजसेवी संस्थांच्या वतीने कुष्ठरोग निवारण समिती केंद्राच्या इस्पितळात उपचार घेणाऱ्या रुग्णांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांना फराळ, मिठाई, धान्य तसेच औषधी चीजवस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांच्या यशस्वितेसाठी शिवाजी शिंदे, रमेश सुर्वे, विक्रम राम, अशोक महाजन, दत्ताराम आंब्रे, जी आर पाटील, नरेश विचारे, आर एस नाईक आदिंनी मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन ;संजय,अजय,आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर

मुंबई (प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व.हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित...