आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात काराव ग्रामपंचायतीचा एल्गार !

गडब( अवंतिका म्हात्रे)स्थानिक युवकांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या पोलाद निर्मितीत अग्रेसर असलेल्या पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू स्टील वर्क्स या कंपनी विरोधात काराव ग्रामपंचायतने एल्गाराची घोषणा केली आहे. सरपंचासह सर्व सदस्यांनी कंपनी विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे.मागील सुमारे दीड वर्षापासून जेएसडब्ल्यू कंपनीकडे ग्रामपंचायतने स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होण्याकरिता प्रयत्न केले. अनेकवेळा कंपनी प्रशासनाशी यासंदर्भात बैठकाही झाल्या परंतु कंपनीने कायम ग्रामस्थांची फसवणूकच केल्याची माहिती सरपंच मानसी पाटील यांनी गडब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.कंपनीने दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी डिप्लोमा डिग्री व आयटीआय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरीता नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या नोकऱ्यांकरिता गडब कारव ग्रामपंचायत हद्दीमध्ये 85 विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. परंतु कंपनीने भरती करताना स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घेतले नाही. त्यामुळे कंपनी विरोधात ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. जेएसडब्ल्यू कंपनीचा ५०% हुन अधिक विस्तार या विभागात होत आहे. येथील नागरिकांना कंपनीच्या प्रदूषणासह अनेक समस्या भेडसावत आहेत. केवळ परिसराचा व नागरिकांचा विकास व्हावा याकरिता ग्रामस्थ या कंपनीला विरोध करीत नाहीत असे असताना देखील कंपनी स्थानिकांवर अन्याय करीत आहे.कंपनीने ग्रामपंचायतकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ग्रामपंचायत हद्दीत ब्लास्टिंग, वृक्षतोड, उत्खनन व बांधकाम केली आहेत. या संदर्भात ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार सुद्धा दाखल केली आहे.
       कंपनीने नैसर्गिक नाल्यामध्ये पाईप टाकून अतिक्रमण करत भराव केल्याने येथील मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.
स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना हक्काची नोकरी, अतिक्रमण हटविणे, खार कारावी येथील सर्वे नंबर ९३ व खारमाचेला येथील सर्वे नंबर ९४ हि गुरचरणाची जमीन ग्रामपंचायतला परत मिळावी.या व इतर मागण्याकरिता १४ ऑक्टोंबर रोजी कंपनीच्या गोवा गेट जवळ काराव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्वं सदस्य व ग्रामस्थ आमरण उपोषण करणार आहेत. सदर पत्रकार परिषदेला सरपंच मानसी पाटील, उपसरपंच दिपाली भोईर, संध्या म्हात्रे, परशुराम मोकल, मनोहर पाटील, मनोज म्हात्रे, सीता पाटील, दिपक कोठेकर, जगदीश कोठेकर, किर्ती म्हात्रे, भाग्यश्री कडू, वैशाली म्हात्रे, मुक्ता वाघमारे, दिनेश म्हात्रे सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...