उरण (विठ्ठल ममताबादे )इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF) लंडन या बहूराष्ट्रीय संघाचे अधिवेशन दर चार वर्षांनी होत असते. मागील अधिवेशन सिंगापूर येथे झाले होते त्यावेळी न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे तब्बल ५० कामगार व पदाधिकारी या अधिवेशनास गेले होते.यावर्षी १३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर रोजी मोरोक्को (आफ्रीकन देश ) येथे हे अधिवेशन भरविण्यात येणार आहे. या अधिवेशनासाठी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या संघटनेचे तब्बल २६ कामगार व पदाधिकारी दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मोरोक्को साठी रवाना झाले. आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असतांना माझ्या कामगारालाही बाहेरच जग फिरता आले पाहिजे त्याला परदेशातील कामगारांच्या समस्या, मागण्या कळल्या पाहिजेत या उद्देशाने कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे या कामगारांना परदेशातील अधिवेशणासाठी घेऊन जात आहेत. असा विचार करणारे महेंद्रशेठ घरत हे एकमेव कामगार नेते आहेत.या सर्वांना विमानात बसण्याची संधी मिळतेय व परदेश पाहण्यासाठी सर्व उत्सुक असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर
डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा