आताही २५ जुलै २०२४ मला शाळेतच चक्कर येऊन पडल्यामुळे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्यावर समजले की मला पाच ब्लॉक आहेत आणि ताबडतोब बायपास सर्जरी करावी लागेल आणि त्यानुसार माझी सर्जरी झाली देखील.या काळात मी अंधेरी येथील होली स्पिरीट हॉस्पिटल मध्ये साधारण दोन आठवडे ऍडमिट होतो, तेव्हाही आमचे सध्याचे प्रिन्सिपॉल फादर निकी आणि इतर फादर जॉन, फादर हेनरी, फादर शिनोय, फादर जेमन, सिस्टर लिझी मला प्रत्यक्ष भेटायला आले होते आणि त्यांनी मजसाठी वॉर्ड मध्ये प्रार्थना केली की मला लवकर आराम पडावा आणि सतत ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते.आमचे शाळेतील अनेक सेवानिवृत्त शिक्षक आणि आताचे शिक्षक, स्टाफ असे अनेकजण येऊन मला भेटून धीर देत होते.तेव्हा समजले की औषधे काम करतातच पण त्यापेक्षाही ही अशी जवळची माणसं असतात ती अधिक सपोर्ट करतात त्यामुळे आपण अधिक लवकर बरे होत असतो.मला होली स्पिरीट हॉस्पिटल मध्ये शाळेतून डायरेक्ट ऍडमिट करताना माझा शिक्षक असलेला मित्र फिलिप रॉड्रिग्ज यांनी घेतलेली मेहनत न विसरता येण्यासारखी आहे.त्याने मला ऍडमिट तर केलेच पण सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तो हॉस्पिटल मध्येच होता.त्यावेळी माझी पत्नी येईपर्यंत त्याने माझी मोठ्या भावासारखी काळजी घेऊन हॉस्पिटल मधील सर्व प्रोसिजर पूर्ण केली.माझी पत्नी योगिता हिने तर माझेसाठी दिवसरात्र एक करून सर्व निर्णय व्यवस्थित घेऊन माझा पाठिराखा म्हणून सावलीसारखी मेहनत घेतली आणि आजही ती सर्व काळजीपोटी कामे करताना मला अधिक प्राधान्य देत असते.माझे कठीण काळात माझे नातेवाईक, मित्र, माझी मुलं यांनी मला जो धीर दिला तो न विसरता येण्यासारखा आहे.अमच्या जॉय संस्थेतील सभासदांनी देखील माझे ऑपरेशन वेळी मला रक्त दिले.विभागातील खासदार वायकर साहेबांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.आमचे शिक्षक नेते जंगले सर देखील वेळात वेळ काढून भेटायला आले होते.अनेकांनी मला नको म्हणत असताना देखील आपुलकीच्या नात्याने आर्थिक सहकार्य केले पण ही सर्व रक्कम मी आमच्या जॉय संस्थेच्या उपक्रमात देण्याचे ठरविले आहे.सर्व माणस माझेसाठी देवमाणसंच ठरली.तेव्हा या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो..
-गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा