आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

श्री व सौ.कोमल प्रदिप टोंपे यांच्या त्रिवेणी नगर, मालाड (पूर्व) येथील घरी सप्तश्रृंगी आईच्या दर्शनाने भाविक आनंदी ; पत्रकार व समाजसेविका सौ.वेदिका विजय आलिम यांच्या परिवारानेही घेतले दर्शन

मुंबई (सौ. वेदिका आलिम) हिंदू प्रथेनुसार शक्तीच्या साधनेसाठी नवरात्रीच्या ९ दिवसाला सर्वाधिक शुभ आणि पुण्यदायी मानलं जाते.नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या ९ रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते.आणि त्यानंतर संपूर्ण ९ दिवस दुर्गेच्या ९ वेगवेगळ्या रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते.नवरात्रीत ९ दिवस अखंड ज्योतही प्रज्वलित केली जाते. दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी बरेच जण ९ दिवस उपासही करतात.त्यांची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं.या नऊ दिवसात विधी-विधानानुसार व्रत, जप-तप केलं जातं. त्यामुळे वर्षभर भगवती मातेची कृपा भक्तांवर होते." 
         श्री व सौ.कोमल प्रदिप टोंपे यांच्या त्रिवेणी नगर, मालाड (पूर्व) यांच्या राहत्या घरी सप्तश्रृंगी आई चा देखावा आणि स्थापना केली होती.श्री सप्तश्रृंगी गड नाशिक पासुन ६० कि.मी अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे.देवीचे मंदिर ७ शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन ४६५९ फुट उंचीवर आहे.यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ‘’अर्ध शक्तीपीठ’’ मानले जाते.देवीची आठ फुट उंचीची मुर्ती पाषाणात कोरलेली असुन दोन्ही बाजुस ९ असे एकुण १८ हात व त्यात विविध आयुधे असलेली आहे.या ठिकाणी माता भगवती निवास करते. ‘’सप्तश्रृंग’’ हया शब्दाचा अर्थ ‘’सातशिखरे’’ असा आहे.गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. गडाच्या शिखरावर विविध औषधी वनस्पती आढळतात. गडावर कालीकुंड, सुर्यकुंड, दत्तात्राय कुंड अशी कुंड आहेत.गडाच्या पुर्वीस खोल दरीने विभागला गेलेला ‘’मार्कंडेय डोंगर’’ आहे.हया ठिकाणी ऋषी मार्कंडेय यांचे वास्तव्य होते, असे मानले जाते.या ठिकाणी त्यांनी दुर्गासप्तशतीची रचना केली चैत्र व अश्विन नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते.सगळ्यांना तेथे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे श्री व सौ.कोमल प्रदिप टोंपे यांच्या त्रिवेणी नगर, मालाड (पूर्व) यांच्या राहत्या घरी सप्तश्रृंगी आईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती.देवीला पारंपरिक पद्धतीने दागिने, आभूषनाणे शृंगार केला होता.फुलांच्या सजावटीने सगळीकडे आनंदाचे,उत्साहाचे वातावरण दिसत आहे.देवीच्या दर्शनासाठी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार व समाजसेविका सौ.वेदिका विजय आलिम यांच्या परिवाराने भेट दिली.यावेळी सौ.सरिता रांबाडे,सौ.रूपा मेदगे,सौ.कोमल टोंपे,कु.श्रेया टोंपे, कु.वेदश्री आलिम,श्री.हरिश्चंद्र कळंबाटे,श्री.अनंत रांबाडे, श्री.विजय आलिम,श्री.दत्तात्रय मेदगे,श्री. प्रदीप टोंपे, कु.मुकेश कळंबाटे, कु.हितेश कळंबाटे आदी मान्यवर उपस्थित होते.सप्तश्रृंगी आईचा देखावा व सजावट कु. हितेश,मुकेश कळंबाटे,दत्तात्रय,आदित्य मेदगे व श्री टोंपे यांनी केली होती.यानिमित्ताने सौ.वेदिका आलिम यांनी महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत यासाठि शक्ती दे,असं साकडं देवीला घातले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...