मुलुंड(सतिश वि.पाटील )जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित सन्मान गुणवंतांचा पुरस्कार जिजाऊंचा 2024 संस्थापक: निलेश भगवान सांबरे साहेब गोरगरीबांचा कैवारी यांच्याकडून 300 गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.डाॅक्टर, वकील, पोलीस, पत्रकार,सैनिक,रूग्ण मित्र, कवी,लेखक, कलाकार, तसेच गडकिल्ल्ये संवर्धन सेवक, समाजात नेहमीच सहकार्य करणारे असे दिग्गज मान्यवर यांचा सन्मान करून पुढील पिढीसमोर आदर्श व प्रेरणा मिळावी हा उद्देश समोर ठेवून सत्कार करण्यात आला.सांबरे साहेबांचे कार्य येथपर्यंत संपत नाही तर राजकीय लोकांनाही लाजवेल अशी त्याची उल्लेखनीय व भरीव कामगिरी मागील अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे कदाचित पेपरही अपुरा पडेल अशी त्याची निस्वार्थ व निशुल्क सेवा राबवत आहेत.
प्रतिवर्षी 25लाख वह्याचे मोफत वाटप,8 सीबीएसई शाळा आणि 1 ज्युनियर काॅलेज 20 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण,1जी आणि निट विशेष मोफत प्रशिक्षण केंद्र, 2 युपीएससी आणि एपीएससी 3000 हजार हून अधिक विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचींग क्लास सेंटर, 45 वाचनालय आणि अभ्यासिका केंद्र,1दिव्यांग मुलींची निवासी शाळा 105 दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या मोफत सुविधा,2 कौशल्य विकास केंद्र एका भागात 8 प्रशिक्षण, 31पोलिस अकॅडमी 5000 हजारांहून अधिक महाराष्ट्र पोलीस दलात दाखल 150हूनअधिक इंडियन आर्मी व बिएसएफ आणि सीआरएफ मध्ये दाखल, 1अग्निशामक केंद्र 109 हून अधिक विद्यार्थ्यांची अग्निशामक दलात निवड,अत्याधुनिक रूग्णालय 24 तास/130 बेडस् मोफत उपचार, दररोज 25हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया,10हून अधिक वेगवेगळ्या अजारांवर शस्त्रक्रिया मोफत,18 मोफत रुग्णवाहिका 24 तास सेवा,200 रक्तदान शिबीर प्रतिवर्षी,रोज 3 आरोग्य शिबीरे,प्रतिवर्षी सुमारे 500 आरोग्य शिबीरे,3236 महिला बचत गट सुमारे 80 हजार हून अधिक महिलांचा समावेश अशा भरीव कामगिरीबद्दल निलेश भगवान सांबरे यांना आजपर्यंत 22 पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 2023 महासन्मान पुरस्कार _ जय महाराष्ट्र व्हिजन 2030, नवभारत के सिल्पकार पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल श्री उमेशजी बैस यांच्या हस्ते असे निस्वार्थ व निशुल्क समाज कार्य करणारे दुर्मीळच त्याच्या कार्याला अधिक भरारी मिळू दे हिच सर्व जनतेकडून शुभेच्छा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा