आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा तर्फे पवईतील युवा कवी प्रतिक कांबळे “ साहित्य भुषण” पुरस्काराने सन्मानित

मुंबई: साहित्य क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की यात बराच अभ्यास अन् समाजातील घडणाऱ्या घटकांना आपल्या लेखनातून वाचा फोडणे म्हणजे साहित्य. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते माझी शंभर भाषणे हे शाहिराचे एक गीत असेल त्यांचेच विचार अंगीकृत करत पवईतील युवा कवी प्रतिक कांबळे हे गेले कित्येक वर्षे आंबेडकरी चळवळीतील साहित्य क्षेत्रात विद्रोही कवी म्हणून महाराष्ट्रात पोहोचले आहेत.
    त्यांचे विद्रोही साहित्य हे सोशल मिडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून सामान्य जनतेला वाचण्यासाठी ते उपलब्ध करून देतात पवई येथे स्थायिक असलेले या विद्रोही कवीने साहित्याची सुरवात वयाच्या १६ व्या वर्षी केली पवई मधील संघटना धम्म दिप सोशल अँन्ड कल्चरल असोसिएशन यांनी २०१५ वर्षी काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात कवी प्रतिक कांबळे यांनी सहभागी होत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले होते त्यानंतर त्यांच्या साहित्यात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
   आजवर त्यांनी विद्रोही, सामाजिक, राजकीय,शैक्षणिक अश्या बऱ्याच कविता व लेख लिहित समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न आपल्या लेखणीतून केल्याचे दिसून येते.त्याचे बरेच लेख, काव्य सर्वत्र प्रकाशित झाले आहेत.त्याच्या यांच समाज प्रबोधनाची जान ठेवून रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा व समता बहुउद्देशीय चारिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ०८ सप्टें. रोजी ठाण्यात आयोजित सत्कार समारंभात रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या हस्ते त्यांना विद्रोही साहित्यिक म्हणून साहित्य भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
   विद्रोही कवी प्रतिक कांबळे यांनी आमच्या सोबत बोलताना सांगितले की समाजासाठी माझी लेखणी कधीच थांबणार नाही समाजात घडणाऱ्या सर्व घटकांना लेखणीतून वाचा फोडण्याचे काम मी सदैव असेल सुरू ठेवेल व साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत राहिलं‌.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सा. भगवे वादळ तृतीय वर्धापन दिन थाटामाटात संपन्न !!

मुंबई: नुकताच मुंबईत, मुंबई मराठी ग्रंथालय सूरेंद्र गावस्कर सभागृहात सकाळी सर्व उपस्थितांना चहा- नाश्ता देण्यात आले. तसेच पुरस्क...