उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )देशातील प्रमुख अकरा बंदरातील गोदी आणि बंदर कामगारांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ करणारा वेतन करार संपन्न झाला.या यशस्वी करारा मुळे गोदी आणि बंदर कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.वेतन करार घडवून आणण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे भारतीय मजदूर महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील व इतर पाच फेडेरेशनचे प्रमुख नेते, पी. एम. मोहम्मद हनीफ, एस. के. शेट्ट्ये, सी. डी. नंदकुमार, नरेंद्र राव, प्रभात सामंतराय, बी. मासेन, इंडियन पोर्ट्स असोसिएशनचे चेअरमन राजीव जलोटाजी (भा. प्र. से.), मॅनेजिंग डायरेक्टर विकास नरवाल (भा. प्र. से.), देशातील प्रमुख बंदरांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, केंद्रीय श्रम आयुक्त सुनील माळी ह्यांच्या उपस्थितीत वेतन करारावर अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी सह्या करण्यात आल्या. हया कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी नेमलेल्या ड्राफ्टिंग समितीचे व्यवस्थापकीय सदस्य श्रीमती शान्ति मॅडम व इतर सदस्यांनी भरपूर मेहनत घेतली. सदर प्रसंगी भारतीय पोर्ट आणि डॉक मझदूर महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत राय, खजिनदार सुधीर घरत, गोपी पटनाईक, ज्ञानेश्वर सोनावणे,अनिल चिर्लेकर, दिपक जाधव, जेनपीए बोर्ड मेंबर रवींद्र पाटील, मंगेश ठाकूर, इ. हजर होते. या यशस्वी करारा बद्दल जेनपीए मधील सर्व कामगारांनी केंद्रीय मंत्र्याचे व कामगार संघटनाचे पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कर्तव्य, करुणा आणि आशेचा किरण : संरक्षण अधिकारी मा. श्रीमती प्रतिभा पाटील मॅडम यांच्या सामाजिक कार्याचा वेध
समाजात कायद्याचे राज्य असले, तरी आजही अनेकदा कौटुंबिक हिंसाचार आणि सामाजिक विषमतेमुळे महिला आणि बालकांना मोठ्या प्रमाणावर अन्यायाला सा...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा