आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

चिपळूण -संगमेश्वर मतदार संघातून वाशिस्ट मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्राव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष प्रशांत यादव यांना मतदारांचा पाठिंबा

कोकण (शांताराम गुडेकर )चिपळूण संगमेश्वर या मतदार संघातून वशिस्ट मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्राव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष प्रशांत बबन यादव यांना शहरी, ग्रामीण भागात वाढता पाठिंबा मिळत असल्याने मतदार, तरुण युवक यांच्यामध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसा पूर्वी देवरुख, चार दिवसा पूर्वी चिपळूण येथे शेतकरी मेळावे पार पडले. त्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
             यादव यांनी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षात अधिकृत प्रवेश केलेला आहे. गेल्या वर्षभरा पूर्वी ते राष्ट्रवादी मध्ये सहभागी झाले आहेत.तेव्हापासून पवार साहेब यांना सात देत आले आहेत.त्यांचा पक्ष अडचणीत असताना पक्षाला उभारी देण्याची, पक्ष वाढवण्यासाठी दिलेली साथ आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे यांचे उपनेते भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना पडत्या काळात दिलेली साथ असेल ती आज वाखान्या जोग आहे.कारण ज्या-ज्या वेळी पक्ष अडचणीत असेल त्या -त्या वेळी भास्कर जाधव गुहागर आमदार आणि आता इच्छुक असलेले आघाडी कडून प्रशांत यादव यांनी पक्षाला दिलेली साथ लक्षात घेता गुहागर मधून पुन्हा भास्कर जाधव आणि चिपळूण -संगमेश्वर मधून प्रशांत यादव विधानसभासाठी आघाडी कडून निवडून येथील असे चित्र आहे.कारण वासिस्ट मिल्क मार्फत घरा -घरा मध्ये यादव यांनी रोजगार देण्यासाठी पुढचे पाऊल टाकत आहेत.कारण आज दहावी- बारावी,पदवीधर युवक -युवती झाले की, शहरात,मुंबई किंवा इतर ठिकाणी जात असतात.कुठेतरी तरी भाड्याच्या खोलीत राहायचे.कसे तरी जीवन जगायचे अशी सुरुवात होते.तरुण पीडीची ही व्यथा वासिस्ट मिल्क अध्यक्ष यांच्या लक्षात आल्याने आणि दुध डेरीकडे शेतकरी यांचे दूर लक्ष झालेले असल्याने परत सर्व तरुण पिडीला शेती कडे प्रवृत्त करून दुध डेरी च्या माध्यमातून तरुण वर्ग यांना त्यांच्या हाताला काम मिळेल रोजगार मिळेल या साठी धडपड पाहता तरुण वर्ग आज यादव यांच्या मेहनती कडे आणि त्यांच्या विचारसरणीकडे वळला आहे.चिपळूण -संगमेश्वर मतदार संघमधून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.कारण त्यांनी ज्या प्रकारे २०२१ मध्ये वासिस्ट मिल्क ची स्थापना केली.आज दररोज ७ हजार शेतकरी त्यांच्या चिपळूण -संगमेश्वरमधील वासिस्ट मिल्क दुध डेरीवर नेहमीत दुध घालत आहेत.चांगल्या दर्जाचे, उत्तम दुध त्यांच्या मिल्क मार्फत मार्केट मध्ये विकले जात आहे. पुण्यात आणि सर्व मुंबई उपनगरात सर्व ठिकाणी उत्तम प्रकारे त्यांचे वासिस्ट मिल्क चे प्रॉडक्ट विकल्या जात असल्याने तरुण पिडीला त्यांच्या हाताला काम मिळत आहे. आज यादव यांच्या रूपाने चिपळूण संगमेश्वर मध्ये विकासासाची गंगा नक्कीच येईल असा विश्वास तरुण वर्गाला वाटत आहे.
              आज तरुण वर्ग मुंबई, पुणे किंवा अन्य ठिकाणी जात आहे तो कोकण मध्ये राहून गावा गावात दुध व्यवसाय करून आपले कुटुंब चांगल्या पद्धतीनी चालवू शकतो.आज शेतकरी यांची मुले शेती कडे किंवा दुध व्यवसायात दुर्लक्ष करीत आहेत त्यांना प्रवाहात आणण्यासाठी तरुण पिडीला हाताला काम देण्यासाठी आज प्रशांत यादव यांच्या सारखा एक देवदूतच मिळाला आहे असे म्ह्टले तर ते वावगं ठरणार नाही.कारण आज देशात शेतकरी शेतीकडे, दुध व्यवसायात लक्ष देत नाही. आपली हक्काची शेती सोडून देत आहे. पूर्वी गावो- गाव दुध डेरी असायच्या.गावात दुध डेरी असायच्या. मात्र मधल्या वीस -पंचवीस वर्षात शेती आणि दुग्ध व्यवसाय याकडे दुर्लक्ष झालेले बघायला मिळाले. दुध डेरी गावा गावातून गायब झाल्या होत्या.आता मात्र यादव यांच्या पुढाकारणे पुन्हा गावा -गावात, प्रत्येक खेड्या -पाड्यात दुध डेरी असो किंवा शेतीपूरक व्यवसाय असो याला सुरुवात झाली आहे.चिपळूण -संगमेश्वर असो किंवा ग्रामीण भागात असो शेती आणि दुग्ध व्यवसाय पुन्हा उभारी घेऊन तरुण पीडीला शेतीवषयी आणि दुध डेरी विषयी आवड निर्माण होईल यात काहीही शंका नाही असं चित्र दिसत आहे.त्यामुळे जनतेच्या मनातील आमदार म्हणून चर्चेत असलेल्या प्रशांत यादव यांना महाविकास आघाडीच्या मार्फत उमेदवारी जाहीर होईल असे चित्र निर्माण झालेले आहे.कारण वर्षभर चिपळूण- संगमेश्वर मतदार संघात यादव खूप मेहनत घेत आहेत.आज त्यांच्या रूपाने चिपळूण- संगमेश्वर मधून आघाडीचा विधानसभासाठी आमदार म्हणून निवडून यावे अशी मागणी होत आहे.त्याच बरोबर महाविकास आघाडी चे सरकार महाराष्टमध्ये यावे अशी सर्व सामान्य मतदार यांची मनापासून इच्छा आहे.पुन्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा आणि यादव आमदार असावेत अशी जनतेच्या मनात इच्छा असून नाक्या-नाक्यावर चर्चा रंगत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नामदेव ठाकूर यांना राज्यस्तरीय कर्तुत्व गौरव पुरस्कार

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )डोंगर परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांना शासनस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घे...