मुंबई (प्रतिनिधी) विक्रोळीतील गुणवंत कामगार विशेष कार्यकारी अधिकारी कामगार नेते प्रभाकर तुकाराम कांबळे यांना "लोकमान्य समाज भूषण पुरस्कार "तर ज्येष्ठ समाजसेवक व सहकार तज्ञ राजेंद्र सहदेव जाधव व आरपीआय नेते राजू विष्णू सोनकांबळे यांना" महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार" चित्रपट अभिनेते झाकीर खान समाजसेवक उद्योजक दिनेश उघडे चित्रपट निर्माती नेहा धुरी स्वातंत्र सैनिक भाऊसाहेब तायडे व आरपीआय नेते सुरेशदादा बारसिंग यांच्या हस्ते ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलनाच्या वेळी नुकताच प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रम समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रत्नवीरांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले असून प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात व प्रकाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
विक्रोळी टागोर नगर येथील ज्येष्ठ समाजसेवक गुणवंत कामगार , विशेष कार्यकारी अधिकारी व राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष कामगार नेते प्रभाकर तुकाराम कांबळे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यानी विविध क्षेत्रात महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर ठरेल असे उल्लेखनीय कार्य केलेले आहे त्यांना 200 हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले असून विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकारी संचालक मंडळावर कार्य करत आहेत. तसेच सामाजिक शैक्षणिक व सहकार विषयक लेखनातून प्रबोधन करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना "लोकमान्य समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
तसेच ज्येष्ठ समाजसेवक व सहकार तज्ञ राजेंद्र सहदेव जाधव व पवई मोरारजी नगर येथील आरपीआय नेते व मंगलदीप पतपेढीचे अध्यक्ष राजू विष्णु सोनकांबळे यानी सहकार ,समाजकारण, राजकारण व बौद्ध धम्म प्रसारक अशा विविध प्रकारच्या क्षेत्रात भरीव असे कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून तसेच वनिता फाउंडेशन, बोधी सामाजिक सेवा मंडळ, सम्यक वैद्यकीय व शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट ,नागवे बौद्ध विकास मंडळ, मंगलदीप सहकारी पतपेढी च्या सर्व पदाधिकारी वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा