आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

कन्नमवार नगर शिवसागर व्हिक्टोरिया हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी जया जगताप सेक्रेटरी संदीप थोरात व खजिनदार पदी स्मिता महाजन यांची निवड

मुंबई (प्रतिनिधी( विक्रोळी कन्नमवार नगर येथील कन्नमवार नगर शिवसागर व्हिक्टोरिया 54 सहकारी गृहनिर्माण संस्थेची व्यवस्थापक कार्यकारी संचालक मंडळाची सन 2024 ते 2029 या कालावधीसाठीची बिनविरोध पंचवार्षिक निवडणूक पार पडली असून संस्थेच्या अध्यक्षपदी जया सुभाष जगताप , सेक्रेटरी संदीप गोविंद थोरात ,खजिनदार पदी स्मिता संतोष महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिपत्याखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी काम पाहिले.
               तसेच संचालक पदावर उमेश भोयर मुकुंद डिंगणकर गणेश कानडे अवधूत कुमार आपटे विकास गांगुर्डे नितेश कदम संजय काजवे तर संचालिका पदावर ममता गोवेरकर आदींची निवड सर्वानुमते करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले असून संस्थेचे माजी सचिव प्राध्यापक गोविंद हळदणकर व इतर पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले असून निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन ;संजय,अजय,आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर

मुंबई (प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व.हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित...