आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

भन्नाट रील बनवा आणि जिंका बंपर बक्षिसे ; वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.अध्यक्ष प्रशांतजी यादव ( नेते - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरद पवार /२६५ चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ )यांचा उपक्रम

देवरुख (शांताराम गुडेकर ) कोकणात "दूध प्रकल्प" घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगून, इथल्याच मातीतल्या भूमिपुत्रांना घेऊन वाशिष्टी प्रकल्प सुरू झाला. आज त्याचा विस्तार होऊन आपण गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना रोजगार देऊ शकलो याचं समाधान आहे.माझी माणसं आणि माझे शेतकरी बंधू यांच्या सहकार्यामुळेच वाशिष्टी आज दिमाखात उभी आहे.असे मत वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.अध्यक्ष प्रशांतजी यादव ( नेते - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरद पवार /२६५ चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ )कायमस्वरूपी व्यक्त करतात. कोकणातील पहिला दुग्ध भव्य प्रकल्प म्हणजे वाशिष्ठी....! "कोकणातील दुग्ध क्रांती"... अनेक प्रयोग करून उत्तम दर्जाचे दुग्ध पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत.वाशिष्टीचे कोकणातील प्रत्येक माणसाशी अतूट नातं आहे, हे नातं विस्तारू या...!वाशिष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हालाही जाणून घ्यायचं आहे.म्हणूनच ही रील स्पर्धा घेऊन जाणून घ्यायचं आहे की जनतेला काय वाटते...!तुम्ही फक्त इतकेच करा की रील बनवा.आणि #दुग्धक्रांती #washithimilk/#wshithidugdhkranti /#प्रशांतपर्ववाशिष्टीपर्व/ #washithimilk / ##washithimilkdairy कडे पाठवा.अधिक माहितीसाठी -8482997334 या भ्रमनध्वनीवर संपर्क करावा.रील विषय १)वाशिष्टी डेअरी -कोकणातील रोजगार क्रांती २)वाशिष्टी डेअरी शेतकऱ्यांची स्वप्न सिद्धी ३)वाशिष्टी डेअरी कोकणात समृद्धीचा मार्ग ४)भन्नाट रील बनवा -वाशिष्टी डेअरी प्रॉडक्ट्स सोबत ५)प्रशांत यादव यांनी कोकणात घडवली दुग्ध क्रांती असे असून रील पाठवण्याची अंतिम तारीख आहे १६/८/२०२४ आहे. बक्षीस वितरण कार्यक्रम दि. १८/८/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता सहकार भवन येथे होणार आहे. या स्पर्धामधील प्रथम पारितोषिक १५,०००/-रुपये, दुसरा नंबर पारितोषिक १०, ०००/-रुपये तर तृतीय पारितोषिक ७,०००/-रुपये असून १० उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून ३०००/- आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभागी सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. आपली रील 9420651197 या व्हाट्सअप नंबरवर पाठवण्यात यावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन ;संजय,अजय,आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर

मुंबई (प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व.हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित...