संगमेश्वर (शांताराम गुडेकर ) वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.अध्यक्ष प्रशांतजी यादव यांना चिपळूण- संगमेश्वर या मतदार संघातून वाढता पाठिंबा मिळत असून जनतेमधून मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेता त्यांना उमेदवारी मिळणे गरजेचे आहे.ते आघाडी कडून इच्छुक आहेत.त्यांची येत्या आठ दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे दर श्रावण सोमवारी फळ, दुध वाटप भक्त गण यांना करत आहेत.पहिल्या सोमवारी मार्लेश्वर ठिकाणी भक्त गण यांना फळ, दुध वाटप करण्यात आले.त्यांच्या मार्फत जनता विद्यालय आंगवली सहित तालुक्यातील सर्व विद्यालयमध्ये जाऊन वह्या वाटपही केले.तसेच आशा अंगण वाडी सेविका यांना पावसाळ्यात रेनकोट वाटपही केले.आतापासूनच त्यांच्या प्रचारात आघाडीचे कार्यकर्ते सामील झालेले आहेत.गेल्या सहा महिन्या पासून ते विभागात कामाला लागलेले दिसत आहेत.येत्या महिना भरात पक्ष प्रमुख शरदजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब आणि खासदार अमोल कोल्हे यांना चिपळूण संगमेश्वरमध्ये आणून जाहीर सभा घेण्यात येणार असे वातावरण निर्माण झाले आहे.सर्व सामान्य व्यक्तीमहत्व अशी त्यांची ख्याती आहे.ते सर्व समाजाला सामावून घेत आहेत. दुसऱ्या सोमवारी(दि.१२ ऑगस्ट २०२४) ते स्वतः आंगवली मार्लेश्वर देवालय (मठ ) मंदिर येथे होणाऱ्या एक्का कार्यक्रमला हजर राहणार आहेत.तसेच ते मार्लेश्वर ठिकाणी (दुसऱ्या सोमवारी) सर्व भक्त गण यांना प्रसाद देण्यासाठी तसेच सेवा करण्यासाठी स्वतः उपस्थित राहणार आहेत.शिवाय तेथे अभिषेकही होणार आहे. आघाडी सोबत मी स्वतः कायम आहे.मी उद्धवजी ठाकरे,शरदजी पवार साहेब,सोनिया गांधी यांच्या आदेशा प्रमाणे जसे माजी खासदार विनायक राऊत यांना सहकार्य करण्यात आले.आमच्या शरद पवार गटा कडून तसेच मी स्वतः महाविकास आघाडीचे काम करत राहणार आहे.मला तिकीट मिलेल की नाही मिळणार तो पक्ष ठरवेल.पण मी पक्ष्याच्या आदेश म्हणून काम करणार आहे.मला संधी मिळाली तर नक्कीच संधीचे सोने करेन अशी प्रतिक्रिया प्रशांत यादव यांनी बोलताना दिली.आज चिपळूण- संगमेश्वर मधून वाढता पाठिंबा मिळत आहे. यापुढेही सर्व समाजकडून पाठिंबा मिळेल अशी आशा आहे.वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा.लि.यांच्या संकल्पनेतून महिला बचतगट सक्षमीकरण व रोजगार निर्मिती झालेली आहे.भविष्यात संधी मिळाली तर यापेक्षा चांगली सेवा देण्यासाठी मी प्रयत्न करेन असं मत यानिमित्ताने व्यक्त केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन ;संजय,अजय,आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर
मुंबई (प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व.हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा