मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील गुणवंत कामगारांना राज्य शासनाच्या इतर विभागाच्या पुरस्कारार्थीप्रमाणे राज्यातील गुणवंत कामगारांनाही लाभ मिळवून देणार असून विधानसभा आचार संहिता पूर्वी कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी अनेक योजनांचे व गुणवंत कामगारांच्या प्रलंबित मागण्याची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी कामगार मेळाव्यात बोलताना दिली . इमारत व इतर बांधकाम विभागाचे कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे कामगार मेळावा नुकताच संपन्न झाला असून त्यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने गेल्या दोन वर्षे मंत्री महोदयाच्या मार्गदर्शनाखाली कामगार विभागाने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे व कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांचा महालक्ष्मीची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला .त्यावेळी सत्कार्याला उत्तर देताना डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितले.
कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यानी कामगार मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून घेतलेल्या अनेक कामगाराभिमुख व समाजाभिमुख चौफेर कार्याचा उल्लेख करून कामगारांच्या मुलांना उच्च प्रतीचे व दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आपण कटिबंध असून लाडक्या बहीण व लाडक्या भाऊ योजनेप्रमाणेच लाडक्या गुणवंत कामगारांनाही न्याय मिळवून देणार असल्याचेही सांगितले.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर जी एन पाटील यांनी प्रथमोपचार संबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन/निवेदन मयुरी परब यांनी केले असून उपस्थित मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी आपल्या प्रास्तविकामध्ये कामगार मंत्री महोदयच्या मार्गदर्शनाखाली कामगार विभागामध्ये सध्या सुरू असलेल्या विविध योजना व उपक्रमाची सविस्तर माहिती देऊन या पुढील काळात संपूर्ण राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबवून कामगार वर्गाची हित जोपासले जाईल असे सांगितले .
कामगार मंत्री नामदार डॉ .सुरेश खाडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्याचे सर्व क्षेत्रातील/आस्थापनेतील कामगारांच्या हिताचे चांगले निर्णय घेतलेले असून लाडक्या बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. त्याप्रमाणे राज्यातील लाडक्या गुणवंत कामगारांना इतर पुरस्कारार्थीप्रमाणे मोफत एसटी प्रवास , राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोल माफ करावा ,रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वे तिकीट दरामध्ये सूट मिळावी, आरोग्य विषयक सोयी सुविधा मोफत मिळाव्यात ,शासकीय विश्रामगृहात राहण्याची सुविधा देण्यात यावी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सल्लागार समिती व कार्यकारी समितीत नियुक्त करावी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संचालक पदी दोन गुणवंत कामगारांची नियुक्ती करावी, म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण संकुलासाठी गुणवंत कामगारांनाही राखीव कोट्यातून १० टक्के मोफत घरे देण्यात यावीत., गुणवंत कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी भरीव सवलती मिळाव्यात, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ओळखपत्र देण्यात यावे, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी स्पर्धकांना तुटपुंजे मानधन मिळते त्यामध्ये भरीव वाढ करावी, लोक कलावंताप्रमाणे गुणवंत कामगारांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात मानधन मिळावे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे दर महिना प्रसिद्ध होणारे मासिक सर्व गुणवंत कामगारांना मोफत देण्यात यावे. विशेष कार्यकारी अधिकारी पदाची नियुक्ती वयाच्या 70 वर्षापर्यंत न करता तह्यात/मरेपर्यंत नियुक्त करावी , अशा विविध प्रकारच्या मागण्या आहेत त्या त्वरित पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्वरित परिपत्रक काढून विधानसभा निवडणुकीपूर्वी गुणवंत कामगारांना त्वरित सोयी सुविधांचा लाभ मिळवून देणे काळाची गरज असल्याचे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी सांगितले.
भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे मानद सचिव दिलीप दादा जगताप यांनी "एक कामगार "महाराष्ट्र राज्याचा कामगार मंत्री झाल्यावर आणि त्यांनी केलेल्या कामाची अंमलबजावणी जलद गतीने होत असल्याचे समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या...
सदर कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ व इमारत व बांधकाम मंडळ च्या वतीने लाभार्थ्यांना विविध उपक्रम राबवल्याबद्दल धनादेश वाटप करण्यात आले तसेच गृहपयोगी साहित्याचे वाटप कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे व कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तसेच प्रमुख मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले असून कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचे मानद सचिव दिलीप दादा जगताप कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश दादा केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला असून कार्यक्रमाला महिला व पुरुष कामगार वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर यांनी मांडले असून सदर कार्यक्रमयशस्वी करण्यासाठी प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार ठाणे विभागाचे सहायक कल्याण अधिकारी नितीन पाटील व सर्व केंद्र संचालक कर्मचारी प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले असून कार्यक्रमाला हास्य कलाकार प्रा. अजय कोष्टी, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे नांदेड जिल्हाध्यक्ष गुणवंत मिसलवाड, रत्नाकर शिंदे पंडित तेलंग, विजय रणखांब समर्थ पेडकर, दत्तात्रय शिरोडकर, पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप घोलप महिला प्रतिनिधी अनिता काळे, साधना भगत ,अमोल पवार महेंद्र ब्रिद, पालघर जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील संजय सुर्वे संजय सासणे महादेव चक्के प्रताप घेवडे गोविंदराव पाचपोर नारायण धनगर विजय आरेकर शिवाजी चौगुले प्रशांत उपाध्ये भास्कर शिंदे दिनकर अडसुळे ठाणे जिल्हाध्यक्ष भरत सकपाळ तानाजी निकम संजय कदम अजय दळवी बाळकृष्ण तावडे आदि 36 जिल्ह्यातील गुणवंत कामगार स्थानिक नगरसेवक विविध संघटनेचे पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी, इमारत व बांधकाम मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा