आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २१ जुलै, २०२४

कोकणातील गुणवंत विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशवंत झालेले नक्कीच दिसतील- सत्यवान यशवंत रेडकर

पेण( प्रतिनिधी): शनिवार, दिनांक २० जुलै २०२४ रोजी शारदा विद्या मंदिर कासू व सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज पेण येथे दोन सत्रात, कोकण भूमिपुत्र, मा. श्री . सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) यांचे २७६ व २७७वे तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या अंतर्गत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित केले होते त्यास उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. पेण तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी शासकीय पदावर निवड यादीत आले पाहिजेत यासाठी माजी विद्यार्थी, सुजाण नागरिक कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील (अभियंता), श्री. मंगेश पाटील, कु. रुचिता तांडेल, श्री.निरंकार पाटील, श्री. अभय पाटील, श्री. चेतन तांडेल यांनी हा शासकीय करिअर विषयक उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित केला होता. या वेळी शारदा विद्यामंदिर कासू मुख्याध्यापिका, सौ. कांबळे मॅडम, श्री. कोळी सर व सार्वजनिक कॉलेज प्राचार्य श्री. एस एच नाईक, श्री. संदेश मोरे यांनी आज चे प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...