नवी मुंबई (दिव्या पाटील )“दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारे गुरु अर्थात दात्तोत्र्यांचे चौथे अवतार श्री स्वामी समर्थ “ यांना मानणारा वर्ग फार मोठा आहे. कोट्यावधी भाविक स्वामींचे नामस्मरण, पूजन भक्तीभावाने करत असतात. श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग ( दिंडोरी प्रणित ) यांच्या घणसोली केंद्रात सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूपद व गुरू दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. घणसोली येथील वैभव पतपेढी पहिला मजला येथे हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरातील अनेक स्वामीभक्तांनी यावेळी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.
सर्व प्रथम स्वामींचे अधिष्ठान स्थापन करून भूपाळी आरती व षोडशोपचार पूजन करण्यात आले. व त्यानंतर स्वामी सेवेकऱ्यांच्या माध्यमातून ११ माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप आणि सामुदायिक श्री स्वामी चरित्र सारामृत पठण आणि मग प्रत्येक सेवेकऱ्याने गुरपद घेऊन गुरुदर्शन केले. यावेळी सेवकांऱ्यांमार्फत योग्य ते नियोजन देखील करण्यात आले होते. महत्वाचं म्हणजे तब्ब्ल ५०० सेवकांऱ्यांनी यावेळी गुरुपद घेतले. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व सेवेकऱ्यांनी गुरुपदाचे महत्त्व समजून घ्यावे तसेच दररोज न चुकता स्वामींचे मनोभावे नामस्मरण करावे व या सेवामार्गात अनेकांना जोडावे असा मोलाचा संदेश देण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा