अलिबाग : बुधवार दिनाक ३१/०७/२०२४ रोजी मा.आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शन खाली मा.रायगड जिल्हा परिषद सदस्या .मा सौ मानसीताई दळवी यांच्या कडून सागवाडी बेलोशीतील ठाकूर समाजातील भगिनी सौ.पल्लवी कैलास पिंगळा यांना धान्य दळण दळण्यासाठी घरघंटी देण्यात आली. सागवाडी हि अलिबाग तालुक्यात दुर्गम भागात असून तेथील महिला भगिनीना ३ ते ४ किलोमीटर पर्यत पायपीट करून धान्य दळण दळण्यासाठी जावे लागते.याची माहिती मा सौ मानसीताई दळवी यांना समजताच त्याने सागवाडीतील भगिनींना धान्य दळणची घरघंटी स्वतः पुढाकार घेऊन स्वखर्चाने सुपूर्द सागवाडीतील भगिनींना केली. तेथील महिलांची होणारी धान्य दळण दळण्यासाठी वणवण थावण्यास मदत केली.
यावेळी मा.श्री.नितीन गुंड- भाजपा तालुका उपाध्यक्ष, मा.श्री.अशोक वारगे- ओबीसी सेल दक्षिण जिल्हा सरचिटणीस , भाजपा , सागवाडी ग्रामस्थ मा.श्री.प्रकाश काशिनाथ पिंगळा, मा.श्री.किशोर मधुकर पिंगळा,मा.श्री.कैलास कृष्णा पिंगळा, सागवाडी भगिनी सौ.गुलाब प्रकाश पिंगळा, सौ. निशा किशोर पिंगळा, सौ. रंजना गजानन मेगाळ, सौ.वनिता संदीप सोनार,बेलोशी ग्रामस्थ शिवसेना कार्यकर्ते मा.श्री जगदीश भोपी, मा.श्री रुपेश काटले, श्री.प्रसाद जाधव उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा