आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ७ एप्रिल, २०२४

संस्कृती प्रतिष्ठान मार्फत महागुढी आणि श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन

कांजुरमार्ग- कांजुरमार्ग(पूर्व) येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे महागुढी सोहळा साजरा होणार आहे. यावर्षीच्या  या गुढी सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ (मूळ स्थान) अक्कलकोटच्या  श्री स्वामी समर्थ महाराज यांनी स्वतःच्या चर्म पादुका आपले प्रिय भक्त चोळप्पा महाराज यांना प्रसाद रुपात दिलेल्या पादुकांचे आगमन होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असणार आहे.सकाळी ८:३० वा गुढीचे पूजन ,सकाळी १०:०० ते ११:०० पादुका पूजन , पादुका दर्शन सोहळा  दुपारी १२:०० ते रात्रौ ९:३० वा. पर्यंत , सायंकाळी ५:०० ते ६:०० वा.जप व नामस्मरण तसेच सायंकाळी ६:०० वा. आरती होणार आहे. तसेच सायं. ७:०० वा. श्री स्वामी समर्थ महारांजांवर आधारीत  भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे.इच्छुक भाविकांनी स्वामी  सेवेसाठी 7900 122 144 या नंबर वर संपर्क साधावा.
      सदर महागुढी सोहळा व   श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा मंगळवार दि ९ एप्रिल रोजी  कांजूर को.ऑप.सोसा. मैदान (क्रॉम्प्टन मैदान), गणपती मंदिर समोर, दातार कॉलनी, भांडुप (पूर्व), मुंबई याठिकाणी पार पडणार आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...