आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १४ एप्रिल, २०२४

अलिबागमधील वावे गावात अमृतमहोत्सवी भव्य श्रीरामजन्मोत्सव सोहळा

वावे -अलिबाग ( प्रतिनिधी -दिनेश तुरे ) :- सालाबादप्रमाणे मुक्काम - वावे , तालुका- अलिबाग , जिल्हा - रायगड येथे मिती चैत्र शु . ९ , नवमी - शके १९४६ , बुधवार दिनांक १७ -०४-२०२४ रोजी ७५ व्या अमृतमहोत्सवी श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे , सकाळी ९.०० वाजता श्रीराम प्रासादिक भजन मंडळ वावे : बुवा - श्री बळीराम गावंड ( संगीत विशारद रवींद्र वाघमारे यांचे शिष्य ) तसेच मृदंगमणी - श्री हरिश्चंद्र न. गावंड , श्री दामोदर गावंड , जनार्दन गावंड , ( संगीत विशारद बाबुराव वाघमारे यांचे शिष्य ) चालक - श्री दिलीप पाटील , संदीप गायकर , मॅनेजर -वसंत गावंड, वावे ग्रामस्थ यांचे सुश्राव्य भजन होणार आहे . श्रीरामप्रभुंच्या जन्मसोहळ्याचे पोथीवाचन सकाळी - १०.०० ते १२.३० या वेळेत होणार आहे . श्रीरामनवमी दिवशी दुपारी १२.३० वाजता मर्यादापुरुषोत्तम श्रीराम प्रभुंचा जन्मोत्सवाचा सोहळा भक्तिभावे संपन्न होणार आहे . भक्तजनांसाठी महाप्रसादाची व्यवस्था दुपारी १ .०० ते ४.०० या वेळेत असणारं आहे. तसेच भक्तजनांच्या मनोजनार्थ पंचक्रोशीतील : बेलोशी, महाजने , आंदोशी, उसर , वळवली , आंबेपूर , या सहा भजनी मंडळांचे कार्यक्रम दुपारी १ ते रात्रौ ७ या वेळेत होणार आहेत , त्यामुळे भक्तजनांना संगीतमय मधुर स्वरांचा आस्वाद मिळणार आहे. श्रीराम प्रभूंची पालखी रात्रौ ९.०० वाजता विविध सजावटीने सजविलेला श्रीरामरथ चलचित्र पालखी सोहळा सोबत देवेश बेंजो पथक वावे , गावदेवी बेंजो पथक वावे , विभागातील ताशा पथक आणि पालखी सोबत वावे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील लेझीम पथकांची रंगत पहायला मिळणार आहे , अशी भव्य पालखी मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे . पालखी सोबत बेलोशी ,महाजने, आंदोशी , या पंचक्रोशीतील व गावातील टाळ मृदूंगधारी वारकरी भजने व भावगीते होणार आहेत . परंपरागत ध्वनी -किरण साउंड सर्व्हिस -वळवली यांचे आहे . वेशभूषा - स्वराली ड्रेसेस थेरोंडा सौ . विनोदिनी कोंडे व रंगभूषा -महेंद्र गावंड यांची असणार आहे . तसेच वेषभुषाधारक भाविक वावे ग्रामस्थ हे श्रीराम प्रभूंच्या पालखीचे प्रमुख आकर्षण असणार आहे . श्रीराम प्रभूंच्या पालखी सोहळ्यात गुलालाची चौफेर उधळण करून ग्रामस्थ आपला आनंद साजरा करतात , तसेच लाठी -काठी , मल्लखांब अशा मैदानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत .आकर्षक रोषणाईने श्रीराम मंदिर उजळून निघणार आहे . टाळ मृदूंगाच्या नादात भक्तीमय वातावरणात या अविस्मरणीय अशा श्रीराम प्रभुंच्या भक्तिमय आनंद जन्मोत्सव सोहळ्याचा व तीर्थप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा व याची देही ,याची डोळा अशा या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद आपण सर्वानी द्विगुणीत करावा असे आवाहन वावे ग्रामस्थांच्या वतीने श्री दिनेश हरिश्चंद्र तुरे ( मुक्त-पत्रकार ,वृत्तपत्रलेखक ) यांनी केले आहे . तसेच नाट्यरसिकांच्या मनोरंजनार्थ शुक्रवार दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी लेखक कमळाकर बोरकर लिखित “बिजली कडाडली “ या धमाल विनोदी तमाशा प्रधान दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. अशा प्रकारे या दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वावे ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे . श्रीराम प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन अलोट भक्तीद्वारे या मंगलमय भक्तीमय सोहळ्याचा आनंद आपण सर्वानी लुटू या ! एकही नारा जय श्रीराम ! एकही नाम जय श्री राम प्रभु ! श्री राम जय राम ! जय जय राम !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...