आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

कोकणचे नमन बुधवारी मुंबईतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात : श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे ७ फेब्रुवारीला आयोजन ;"लोकं काय म्हणतील ?" नाट्यकृती देईल हास्याची मेजवानी व प्रेरणादायी सामाजिक संदेश...!!

मुंबई (शांताराम गुडेकर )चिपळूण तालुक्यातील अंतीम टोकाच्या कातळसर ग्रामीण भागात वसलेल्या मौजे मुर्तवडे ( कातळवाडी ता.चिपळूण,जि.रत्नागिरी ) गावातील "नव जवान बाळ कला मित्र मंडळ ( रजि. ) मंडळ गेली अनेक वर्षे नमन कलेचं जतन - संवर्धन करत आहे.उपरोक्त मंडळातर्फे खास रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव बुधवार दि.०७ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रौ ठीक ०८.३० वा.मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले पूर्व, मुंबई येथे ग्रामदैवत आई श्री वाघजाई देवीच्या कृपेने "नव जवान बाळ कला मित्र मंडळ ( रजि.) प्रस्तुत/आयोजित,सखाराम लक्ष्मण नेवरेकर निर्मित व अक्षय य.नेवरेकर संकल्पित कोकणची लोककला जपणारे "ग्रामीण - मुंबई रंगभूमीवरील सुप्रसिद्ध नमन'' या वर्षातील शुभारंभ प्रयोग सादर करणार आहे.साहित्य संघ गिरगांव येथे १३ जानेवारी २०२४ रोजी हा शो हाऊस फुल्ल झाला होता.यामध्ये दमदार खेळे, श्री गणेश आराधना गण,राधा - कृष्णाची प्रेमलीला - गवळण,सहित नावीन्यपूर्ण नाट्य कलाकृती करण्यासाठी मंडळाचे यशस्वी कलाकार पुन्हा एकदा सज्ज झाले असून "मराठीची अस्मिता जपणारा आणि कोकणची लोककला जोपासणारा एक मराठमोळा कार्यक्रम मृदुंगमणी/ढोलकीपट्टू अक्षय नेवरेकर,संगीतकार मास्टर सुधाकर धा.नेवरेकर,पॅड मास्टर सतीश रा.नेवरेकर,गीतकार मास्टर सुरेंद्र दे.नेवरेकर, दिग्दर्शक महेश नेवरेकर सह अजय कारकर यांच्या साथीने लोकप्रिय गायक/शाहीर रविंद्र भेरे व नवोदित गायिका प्रथमी मोहिते यांची प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या तोंडावर रूळतील अशी सुमधुर गाणी व हास्य मैफिलीत रुतलेली समजातील क्लिष्ट प्रवृत्तीवर भाष्य करणारी प्रबोधनात्मक नाट्यकृती- "लोकं काय म्हणतील....?" रसिक प्रेक्षकांसाठी पाहणे पर्वणीच आहे."नमन"या लोककलेवर प्रेम करणाऱ्या तमाम कोकणवाशीय,मुंबईकर,नाट्यरसिक प्रेक्षकांनी सहकुटुंब,सहपरिवार समवेत उपस्थित राहून हा कार्यक्रम पहावा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संतोष घाणेकर - ९८३३६८९६८२/रमेश कोकमकर -८८५०४२२७९९/रमेश भेकरे - ९५९४३५२८६३/दिपक कारकर- ९९३०५८५१५३ / पांडुरंग आलिम- ,७९७७६१२६९५ यांच्याशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

उरण (विठ्ठल ममताबादे )मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय ता...