नवी मुंबई ( ता 15 ) लोकप्रिय कवी अरविंद पाटील यांच्या " विखुरलेल्या कविता " या आगळ्या वेगळ्या कवितासंग्रहाचे दिनांक 13 फेब्रुवारी रोजी ठाणे येथे अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले. या प्रसंगी उपस्थितांनी पाटील यांच्या कवितांचे अभिवाचन करून स्तुत्य प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
काव्यरसिकांच्या गळ्यातील ताईत ठरलेले लोकप्रिय कवी अरविंद पाटील यांच्या " विखुरलेल्या कविता " या दुसऱ्या कवितासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. जयश्री पाटील, राजश्री बुबेरा, मनीषा घरत, शर्मिला म्हात्रे, रेश्मा पाटील, तन्वी पाटील, मानसी पवार, माहीर घरत, किमया बुबेरा, अंतरा घरत, सावी पवार, लिलाबाई म्हात्रे, सुनील बुबेरा, रवींद्र घरत, महेश पाटील, हिमांशू पाटील निल बुबेरा, चिराग म्हात्रे , कवी अरविंद पाटील व अनेक काव्यरसिकांच्या उपस्थित हा आनंद सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला.
जेष्ठ साहित्यिक सतीश तांबे यांनी या कवितासंग्रहासाठी ब्लर्ब लिहिले असल्याने या कवितासंग्रहास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. चित्रकार सुरेश पाटील यांनी या संग्रहाचे आकर्षक मुखपृष्ठ साकारले आहे. आपल्या आधीच्या ग्रंथाप्रमाणेच या कवितासंग्रहास सुद्धा रसिकांचे प्रेम लाभेल असा आशावाद कवी अरविंद पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा