आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

मानव सेवेचा गौरव

नवी मुंबई( सुभाष हांडे देशमुख): जिवाची कुठल्याही प्रकारची पर्वा न करता केवळ स्वत:च्या न्यायासाठी व पुढील येणार्‍या कित्येक पिढींसाठी संपूर्ण परिसरासह मराठा समाज नवी मुंबई मध्ये एकवटला. त्यातले कित्येक जण तर आपलं वैयक्तिक शारीरिक दुखणं सोडून निव्वळ समाज हितासाठी एकत्र आले. कितीतरी जण आपल्या नियमित चालू असणार्‍या डायबेटिस, रक्तदाब गोळ्या विसरून आले, कित्येकांना अति थंडी मुळे दमा अस्थमा वाढून श्वासांचे त्रास देखील उद्भभवले, बदलत्या पाण्यामुळे व हवामानामुळे सर्दी, घसा अंग दुखी, अति प्रमाणात चालल्यामुळे पायाला उष्णतेचे फोड आले होते. अशा सर्वांचीच सेवा नवी मुंबई सकल मराठा समाज डॉक्टर्स असोसिएशन टीम व नवी मुंबई रिटेल व होलसेल केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सकल मराठा समाज आरक्षण साठी आलेल्या सर्व बंधू व भगिनींसाठी दिवस रात्र मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. त्यासाठी नवी मुंबई रिटेल व होलसेल केमिस्ट असोसिएशन चे सेक्रेटरी सुनील छाजेडजी व त्यांची संपूर्ण टीम व सकल मराठा समाज चे नवी मुंबईतील सन्मानीय डॉक्टर्स, डॉ. रवींद्र गोसावी यांसह डॉ. गरड, डॉ. बाळू जगताप, डॉ. जगदीप खुळे , डॉ. बालाजी पाटील, डॉ. बाळू निकम, डॉ अजित घार्गे, डॉ. पवार, डॉ. कुचिक, डॉ. वाके आधी डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अपूर्ण घेऊन वैद्यकीय सेवा पुरविली. आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला व सर्वजण अभिनंदनास पात्र ठरले.
  म्हणूनच मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे -पाटील यांच्या मराठा आरक्षण दिंडी मध्ये नवी मुंबई मध्ये आलेल्या बहुसंख्येने मराठी बांधवांची केलेली आरोग्य सेवा व मोफत मेडिसिन पुरवल्या बद्दल डॉ रवींद्र गोसावी तुर्भे नवी मुंबई व त्यांच्या सर्व सहकार्यांचे सकल मराठा समाज नवी मुंबई तर्फे अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या

दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...