मुंबई : गोरेगाव ( पूर्व) येथील संकल्प सहनिवास फेडरल सोसायटी, संस्कृतीक मंडळ, महिला मंडळ व संकल्प युवा यांच्या संयुक्त विद्यमाने माघी गणेशोत्सवा निमित्त संकल्प महोत्सवाचे आयोजन, संकल्प संकुलातील गणेश मैदानात संपन्न झाले. विजयी संघाला उपस्थित मान्यवराच्या हस्ते संकल्प चषक देऊन गैरवण्यात आहे.
तसेच दि 2 फेब्रु. ते 13 फेब्रु. या काळावधीत, खाद्य महोत्सव,व्यापार पेठ, हळदी कुंकू, डबलबारी भजन, होम मिनिस्टर, मराठी वाद्यवृद, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर इत्यादी चे आयोजन केले आहे.
दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे पासून, गणेश याग, मंगलंचरण शोभा यात्रा, गणेश पूजन, अथर्वशीर्ष आवर्तने, गणेश जन्म सोहळा, पालखी मिरवणूक व महाप्रसादाचेआयोजन करण्यात आले आहे.
माघी गणेशोत्सव साठी मंडळाचे अध्यक्ष -चंद्रकांत माने, धनंजय पानबुडे, सचिव - अजय पवार, हनुमंत सुळे सह सर्व पदाधिकारी, सदस्य अहोरात्र मेहनत घेत आहेत. तसेच सर्व गणेश भक्तांनी व नागरिकांनी गणेशाचे दर्शन घेऊन महाप्रसादा चा लाभ घ्यावा असे संस्थेने कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा