आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

संदेश विद्यालयाचे 'मिशन फ्युचर क्रॉप' ठरले अव्वल ;सर्वोत्कृष्ट बालनाट्यासह पटकावली ९ पारितोषिके

विक्रोळी (शांताराम गुडेकर)जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी आयोजित जे.ई.एस. करंडक राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धा-२०२३ ची अंतिम फेरी नुकतीच जोगेश्वरी येथे संपन्न झाली. यात ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) येथील संदेश विद्यालयाच्या विज्ञान व निसर्ग मंडळ चमूने सादर केलेल्या 'मिशन फ्युचर क्रॉप' या बालनाट्याने सर्वोत्कृष्ट बालनाट्याच्या प्रथम क्रमांकासह एकूण ९ पारितोषिके पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
             सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - प्रथम : सिद्धी संदीप गोरीवले, सर्वोत्कृष्ट अभिनेता - प्रथम : तन्मय तानाजी चोरगे, सर्वोत्कृष्ट लेखक - प्रथम : शुभम श्रीराम भोबस्कर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - द्वितीय : अंतरा कृष्णा खंडगावकर व शुभम श्रीराम भोबस्कर, सर्वोत्कृष्ट नेपथ्य - द्वितीय :  ऋषिकेश निवृत्ती आंद्रे, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - उत्तेजनार्थ : राजेश विजय शिंदे, अभिनय नैपुण्य प्रमाणपत्र - सिद्धी संदीप गोरीवले व तन्मय तानाजी चोरगे आणि बालनाट्य चळवळीची पुरस्कर्ती शाळा अशी पारितोषिके रंगपरिनिरीक्षण महामंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर व आशुतोष पत्की यांच्या हस्ते देऊन शाळेला सन्मानित करण्यात आले.
            २०२३ या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून शाळेने विद्यार्थी व समाजामध्ये प्रबोधन व्हावे म्हणून पौष्टिक तृणधान्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे, पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर करून भविष्यात तृणधान्याच्या उत्पादनात होणारी वाढ, त्यांची योग्य वैज्ञानिक साठवणूक पद्धती या बाबींचा ऊहापोह या बालनाट्याच्या माध्यमातून अतिशय रंजक व विनोदी पद्धतीने करण्यात आला आहे. यापूर्वी शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई उत्तर विभाग व नेहरू विज्ञान केंद्र -  वरळी यांच्या वतीने आयोजित वॉर्ड व जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात या विज्ञान नाट्याने प्रथम क्रमांक तर मुंबई विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सुयशप्राप्त विद्यार्थी व सर्व तंत्रज्ञांचे संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे व शाळेचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...