घाटकोपर (शांताराम गुडेकर )महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा समाज बांधवांच्या आंदोलनाला आता एम आई एम ने जाहीर पाठिंबा दिला असून त्याबाबत चे एक निवेदन पत्रक पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाला मुस्लिम बांधवांकडून पाठिंबा वाढत असताना मुंबईतून एम आई एम मुंबई प्रदेशचे जनरल सेक्रेटरी अनवर शेख यांनी मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देत असल्याचे सांगितले. अनवर शेख म्हणाले इतिहास पाहता मराठा समाजाने नेहमीच मुस्लिम समाजाच्या मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावल्या मध्ये मुस्लिम बांधव देखील असत. आणि त्याच भूमिकेतून आम्ही आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा बांधव आणि जरंगे पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांच्या सोबत चालणार आहोत. 20 जानेवारी रोजी मराठा बांधवांचा मुंबईत मोठा मोर्चा धडकणार आहे आम्ही पक्षाच्या वतीने जरंगे पाटील यांचे स्वागत करणार आहोत आणि त्यांच्या सोबत मोर्चा सहभाग घेणार असल्याचे मुंबई प्रदेश जनरल सेक्रेटरी अनवर शेख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा