आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर तर्फे वार्षिक दिनदर्शिका -२०२४ चे प्रकाशन

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
                    समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत.या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात.या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य , कपडे , गृहोपयोगी वस्तू , औषधे , वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, प्रदीप गावंड,सचिन साळूंखे, रमेश पाटील,वैभव घरत, हनुमंता चव्हाण यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
           पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर तर्फ मंडळाच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन दि.२७/१२/२०२३ रोजी आर.सी.एफचे सी. एम.डी.सन्मा.श्रीनिवास मुडगेरीकर आणि आर.सी.एफ डायरेक्टर फायनान्सच्या नजहत शेख मॅडम यांच्या शुभहस्ते आर. सी. एफ च्या प्रियदर्शनी येथे करण्यात आले.याप्रसंगी पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री.अशोक भोईर,प्रकाश शेजवळ,वैभव घरत,सचिन साळुंखे,स्वाती नाईक, रहीम शेख, ऋषी जंगम,सतीश कुंभार,विनायक जोशी, संतोष नाईक आणि सुशिल मेस्त्री आदी मान्यवर तसेच मंडळाचे पुरुष व महिला सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना सन्मा.सी.एम.डी यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याचा गौरव करुन मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक...