मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका नियोजन विभागाच्या वतीने जेंडर बजेटच्या महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांगांसाठी स्वयंरोजगाराकरिता लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनरसह खरेदीसाठी थेट अर्थसहाय्य देण्याचे जाहिर करण्यात आले आहे.
सदर योजनेचा लाभ बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या दिव्यांगांनाच होणार आहे तरी महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवासी असणाऱ्या दिव्यांगांनी http://portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर जाऊन About BMC - Departments - Department Manuals - Assistant Commissioner Planning - Docs - "दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनरसह खरेदीकरता अर्थसहाय्य" यावर क्लिक करून अर्जाचा नमुना प्राप्त करून घ्यावा व सोबत दिलेल्या पात्रतेचा निकष, योजनेच्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे समजून घेऊन त्यानुसार अर्ज भरून दि. १५ डिसेंबर २०२३ पर्यंत दुपारी २:०० वाजेपर्यंत सर्व कागदपत्रांसह पूर्ण भरलेला अर्ज संबंधित विभाग कार्यालयाच्या आवक जावक कक्षाकडे जमा करावा असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका नियोजन विभागाद्वारे काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा