आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

सहकार हा निरंतर चालणारा असून रोजगार व स्वयंरोजगाराची निर्मिती करून आपला विकास घडविणे काळाची गरज : मा.प्रकाश दरेकर (अध्यक्ष मुंबई जिल्हा हाउसिंग फेडरेशन)

 मुंबई ( प्रतिनिधी ) सहकार हा निरंतर चालणारा असून सहकाराच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराची निर्मिती करून आपला विकास घडविणे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे संचालित सहकार प्रशिक्षण केंद्र मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणारी सहकारी व्यवस्थापन पदविका प्रमाणपत्र परीक्षेच्या DCM समारोप प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार प्रशिक्षण केंद्राने उपप्राचार्य एम.बी .फाळके होते.          
          महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे ही राज्य सहकारी शिक्षण, प्रशिक्षण, प्रचार व प्रसिद्धीचे कामकाज करणारी राज्यातील शिखर प्रशिक्षण संस्था असून 13 जुलै 1918 रोजी स्थापन झालेली आहे.105 वर्षाची परंपरा लाभलेल्या संघाचे राज्यात 13 सहकार प्रशिक्षण केंद्र व 33 जिल्हा सहकारी बोर्ड असून संघाचे 225 प्रशिक्षक व 105 शिक्षकेतर सेवक कार्यरत आहेत. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थांमध्ये सहकारी पदविका प्रमाणपत्र DCM अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे सहकारी व्यवस्थापन पदविका वर्ग ( DCM ) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या धरतीवर चालू करण्यात आला असून 13 सहकार प्रशिक्षण केंद्रामार्फत सहकारी व्यवस्थापन वर्ग वर्षातून दोन सत्रातून घेण्यात येत असल्या असल्याचे मुंबई सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एस एस धरणे उपप्राचार्य एम.बी.फाळके व प्राध्यापक अनंत बोंबले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.                          
       श्रीमंत व गरिबीची दरी कमी करण्यासाठी सहकार महत्त्वाचा असून सहकाराला अध्यात्मिकेची जोड असावी, त्याचबरोबर संस्थेची संख्यात्मक वाढ न करता गुणात्मक वाढ होण्यासाठी एकमेकाला सहाय्य केले तरच सहकार हा समृद्धीकडे वाटचाल करत राहणार असल्याचे ( DCM ) परीक्षेचे पर्यवेक्षक कोल्हापूर सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एस.एल.ढेरे यांनी सांगितले.                        
            महाराष्ट्र सहकार कायदा कलम 74 नुसार व वैद्यनाथन समितीच्या शिफारशीनुसार संस्थांनी संस्था पातळीवर सचिवाच्या नेमणुका करण्यासाठी सहकारी पदविका प्रमाणपत्र परीक्षा ( DCM ) ची उपयुक्तता असल्याने या परीक्षेसाठी राज्यभरातून मागणी वाढल्याचे विचारात घेऊन सहकारी व्यवस्थापन पदविका पत्राचार कोर्स दुरस्त शिक्षण प्रशिक्षण द्वारे देण्यासाठी राज्यसंघाने सुरू केल्यामुळे माहे डिसेंबर 2023 च्या सहकारी व्यवस्थापन पदविका प्रमाणपत्र परीक्षेसाठी विविध सहकारी क्षेत्रातील मुंबई केंद्रातून एकूण 32 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.या परीक्षेसाठी सहकार, सहकारी कायदा व संबंधित कायदे, वित्तीय लेखन व हिशोब तपासणी, सहकारी व्यवस्थापन, सहकारी पतपुरवठा व बँकिंग, संगणक वापर परिचय, व्यवसायिक शिक्षण अशा प्रकारे एकूण सहा विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही एका विषयावर गृहपाठ /स्वाध्याय तसेच ऑनलाइन परीक्षा घेतली जात असून कोणत्याही एका विषयावर एखाद्या सहकारी संस्थेचा /कारखान्याचा अभ्यास दौरा/निरीक्षण दौरा करून त्या संस्थेच्या प्रत्येक विभागाची माहिती सांगितल्यानंतर ती संकलित करून त्या संस्थेची माहिती पुस्तिका प्रत्येक परीक्षार्थी कडून तयार करून घेतली जाते, यावर्षी महाराष्ट्रातून नंबर एक म्हणून ज्या संस्थेचा उल्लेख केला जातो, अशा शिवकृपा सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई रबाळे नवी मुंबई येथील प्रशासकीय कार्यालयात भेट देण्यात आली. निरीक्षण दौऱ्यामुळे सहकारी संस्थेचे प्रत्यक्षात कसे कामकाज होते यावरून प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून सहकाराचा अभ्यास या परीक्षेतील महत्त्वाचा भाग असल्याने, प्राध्यापक आर आर निंबाळकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.                             
          नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून कोल्हापूर सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एस.एल.ढेरे .तर सुपरवायझर म्हणून उपप्राचार्य एम.बी.फाळके. प्रा. आर. आर.निबाळकर,प्रा.पी.जी.गायकवाड.प्रा.अनत बोंबले, यांनी काम पाहिले असून परीक्षेला ठाणे जिल्हा बँकेचे कर्मचारी तसेच दत्तसेवा सहकारी पतपेढी,उदयश्री को. ऑप. बँकेचे व्यवस्थापक, कराड,जलाराम, धनलक्ष्मी पतपेढी, सिव्हील इंजिनिअर, तसेच शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक (ऑडिटर )आदी क्षेत्रातील 25 ते 30 विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देऊन आपले भविष्य आजमावण्याचा प्रयत्न केला असून परीक्षेच्या समारोप प्रसंगी प्रत्येक परीक्षार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनंत बोंबले यांनी केले. तर या परीक्षा समारोप कार्यक्रमा वेळी मुंबई जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर व कोल्हापूर सहकारी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एस.एल.ढेरे, प्रा.आर.आर.निबाळकर, उपप्राचार्य एम.बी.फाळके. यांनीही मार्गदर्शन केले असून प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले असून सर्वांचे आभार प्राध्यापक पी .जी .गायकवाड यांनी मानले असून सर्वांना अल्फोपहार वाटप करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक...