आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

डॉ .शालिनी वारद उत्कृष्ठ भस्म व इष्टलिंगधारी गणेश उत्सव पुरस्काराने सन्मानित

उरण दि २(विठ्ठल ममताबादे ) वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणा-या व वीरशैव लिंगायत समाजाचे हक्क व अधिकार त्यांना मिळवून देणारी वीरशैव लिंगायत समाजाची प्रभावी व आक्रमक संघटना म्हणून शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना भारतात सर्वांना सुपरिचित आहे.या शिवा संघटनेच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२३ रोजी २८ व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन श्री क्षेत्र कपीलधार,जिल्हा बीड येथे करण्यात आले होते. या वार्षिक मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी उत्कृष्ठ भस्म व इष्टलिंगधारी गणेश उत्सव पुरस्कार डॉ. शालिनी भिमाशंकर वारद, रुद्राक्षी क्लिनिक,पंचकर्म सेंटर, उलवे ता. पनवेल जि: रायगड यांना प्रदान करण्यात आला. शालेय शिक्षण‌मंत्री मा.दिपक केसरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंढे,शिवा अखिल भारतीय युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, शिवा संघटनेचे सर्व राज्यस्तरीय पदाधिकारी, शिवाचार्य, धर्मगुरु, व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. शालिनी वारद यांना शिवा संघटनेतर्फे राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक...