आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

ज्येष्ठ कामगार नेते श्री. परशुराम कोपरकर यांना " कामगार-भूषण जीवन गौरव " पुरस्कार प्रदान

मुंबई: भारतीय लोकसेवा समिती, मुंबई या संस्थेने ज्येष्ठ कामगार नेते श्री. परशुराम कोपरकर यांना भांडुप, मुंबई येथे नुकताच " कामगार भूषण - जीवन गौरव " पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ते वयाची ७५ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सव साजरा करीत आहेत. या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांना त्यांच्या कामगार क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी आणि  सहकार, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री. परशुराम कोपरकर यांना त्यांच्या पत्नी मंदाताई कोपरकर यांच्या समवेत खासदार मा. संजय राऊत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी खासदार संजय राऊत यांनी कामगार चळवळ आता कशी क्षीण होत चालली आहे, याची माहिती दिली. तर ' सर्व पक्षीय मित्र असलेले कामगार नेते व कामगारांचे प्रश्न कसबीने सोडविणारे लढवय्ये कामगार नेते ' म्हणून त्यांचा गौरव केला. त्यांना शतायुषी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. दिवंगत कामगार नेते दीना बामा पाटील यांच्यामुळे ते कामगार क्षेत्रात आले. गेले पाच दशकापासून मजदूर काँग्रेस या कामगार संघटनेत सरचिटणीस म्हणून आहेत. या सोहळ्याला आमदार सुनील राऊत, आमदार विजय चौगुले, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार शाम सावंत, माजी आमदार भास्कर विचारे, कामगार नेते भूषण सामंत आदी मान्यवरांच्या समवेत विविध राजकीय पक्षांचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी,अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पुरस्कार प्रदान करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. जयवंत पाटील, खजिनदार कविता पाटील, आणि पूर्वा पाटील, आशा ताजणे, मोहन ताजणे हे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. परशुराम कोपरकर यांना " कामगार भूषण - जीवन गौरव "  पुरस्कार दिल्याबद्दल भांडूप मधील नागरिकांनी शुभेच्छा वर्षाव केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे कृतज्ञता पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख: यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्रा तर्फे प्रतिवर्षी नवी मुंबई कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य क...