आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३

श्री पाणबुडी देवी कलामंच आयोजित "बहुरंगी भारूड" प्रयोग पहा असे शाहीर सचिन धुमक यांचे कोकणवासीय कलाप्रेमीं मुंबईकरांना आवाहन

मुंबई (शांताराम गुडेकर )शाहीर सचिन धुमक (ढाकमोली ) लहान वयापासून श्री पाणबुडी देवी कलामंच आयोजित "बहुरंगी भारूड" प्रयोग पहा असे शाहीर सचिन धुमक यांचे कोकणवासीय कलाप्रेमीं मुंबईकरांना आवाहन  आवड असल्यामुळे आजवर कोकणच्या नमन /शक्ती -तुरा या लोककलेची सेवा करत असताना माझ्या कलेवर प्रेम करणारे अनेक चाहते मंडळी मिळून एक परिवार झाला. या परिवारला टीम सचिन चाहते परिवार मुंबई /ग्रामीण असे नाव देण्यात आले.यामधून कायतरी नवीन करू या... या कल्पनेतून सामाजिक, शैक्षणिक क्रीडा आणि कला या विभागात कार्य चालू केले.त्यातून नव्या कलाकारांना पहिलं- वहीलं मार्गदर्शक शिबीर राबवले.सांगायला अभिमान वाटतो की शाहीर आणि त्याचे चाहते म्हणून असं शिबीर पहिलंच झाले.याचं सर्व श्रेय चाहते परिवाराला जाते.कारण त्यांच्यामुळे हे करणे शक्य झाले.त्या शिबिरातुन नवीन कलाकार निवडले आणि त्यांना रंगमच मिळावा म्हणून एक संकल्पना सुचली ती म्हणजे भारुड.आता भारूड मध्ये खूप प्रकार आहेत पण कोकणात जे सादर केल जाते ते भारूड फक्त त्यात खेळे नसतात बाकी नमन सारखाच प्रकार आहे.भारूड,ती संकल्पना आज सत्यात उतरत असताना मला खूप आनंद होत आहे, त्यासाठी माझ्या सर्व कलाकार आणि त्यांना घडवणारी आमची संपूर्ण टीम आज अवोरात्र मेहनत घेत आहेत कारण कोणतही काम एकट्याने होत नाही त्यासाठी पाठीशी मनुष्यबळ लागत मी नशिबवान की अशी जीवाला जीव देणारी मानस आज आमच्या परिवारात आहेत त्या सगळ्यांची सांगड बांधून चाहत्यांच बहुरंगी भारूड रूपाने सुसज्ज आहेत. असं मत शाहीर, लेखक सचिन धुमक यांनी बोलताना व्यक्त केले. सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ठिक ८:०० वाजता श्री पाणबुडी देवी कलामंच ज्यांनी आयोजनात आजवर एक नंबर आयोजक म्हणून दबदबा कायम राखला आहे.त्यांच्या आयोजनात चाहते परिवाराच्या निवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यास व कोकणची ही लोक कला जिवंत ठेवण्यासाठी आपण अगत्य यावे असे शाहीर सचिन धुमक यांनी सर्व कोकणवासीय कलाप्रेमींना आवाहन केले असून अधिक माहितीसाठी शाहीर सचिन धुमक ( ढाकमोली संपर्क-9594640545)यांच्याशी संपर्क साधवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...