आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३

६ डिसेंबर रोजी मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात "अशी ही श्यामची आई" २ अंकी नाटकाचा प्रयोग ; नाट्यप्रयोगातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा ध्यास

मुंबई - (दिपक कारकर ) खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या आयुष्यातील शैक्षणिक जडणघडण जिथून होते ती गावची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होय. आताच्या काळात बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी पटसंख्या कमी,मग शिक्षक कमी ह्यातून अनेक शाळा बंद होताना दिसतात.कोकणासारख्या प्रांतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेताना, जिल्हा परिषदेची शाळा अगदी सोईस्कर असते. मग अशाच शाळेतून शिक्षण घेणारी विद्यार्थीरुपी पाखरे इथूनच आगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपल्या अंगीकृत गुणांनी ठसा उमटविताना दिसतात.परंतु ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले,जी शाळा आज गावचे विद्यामंदिर आहे.आणि त्यासाठी एकजुटीने निर्धार करत रत्नागिरी जिल्ह्यातील "जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा,चवे ( ओलपाट वाडी ) गावच्या शाळेच्या नूतनीकरण करिता ओम् नमो जांभळेश्ववर हनुमान सेवा मंडळ,मुंबई आयोजित मुंबई रंगभूमीवर नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
    बुधवार दि.०६ डिसेंबर २०२३ रोजी रात्रौ ०८ : ०० वा. मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह,विले पार्ले ( पूर्व ) येथे व्ही आर प्रोडक्शन निर्मित, ओम् नमो जांभळेश्र्वर हनुमान सेवा,मंडळ ( मुंबई ) प्रस्तुत/आयोजित आई अन् मुलाच्या अतूट नात्याची विलक्षण कहाणी व्यक्त करणारे दोन अंकी नाटक - "अशी ही श्यामची आई" हा नाटयप्रयोग सादर होणार आहे.
    ह्या नाटयप्रयोगाचे लेखन स्वप्नील जाधव,दिग्दर्शन महेश गावणकर यांनी केलं आहे.पार्श्वसंगीत - अविनाश गावणकर,प्रकाश योजना - विनय कुळ्ये,तर कलाकार म्हणून मधुरा सामक,मयुरी निकम,सिमरन गावणकर, राजेंद्र गावणकर, हरिश्चंद्र गावणकर,मंगल सावंत, महेश गावणकर व बाल कलाकार स्मरण गावणकर आदी भूमिका साकारताना दिसतील. सदर प्रयोगातून मिळणारा निधी शाळेच्या नूतनीकरण करण्यास योगदानमय असून ह्या नाट्यप्रयोगाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी वैभव गावणकर - ७४४७३८५१९६,रमेश गावणकर - ९५९४३१६६१८ यांच्याशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...