आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना रत्नश्री पुरस्कार 2023 ने सन्मानित

नवी मुंबई : राष्ट्रीय बाल आणि महिला विकास परिषदच्या मान्यतेने रत्नश्री पुरस्कार 2023 सन्मान राष्ट्रीय बाल आणि महिला विकास परिषदेच्या वतीने नवी मुंबई तील राष्ट्रीय बाल आणि महिला विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे जॉइंट सेक्रेटरी विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना ‘रत्नश्री पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. ही निवड राष्ट्रीय बाल आणि महिला विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बिरेन दवे व राष्ट्रीय बाल आणि महिला विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. रचना भीमराजका आणि राष्ट्रीय बाल आणि महिला विकास परिषद चे राष्ट्रीय संचालक. आणि राष्ट्रीय मानवी हक्क आणि भ्रष्टाचार विरोधी दल चे राष्ट्रीय सचिव मा. माया ठाकुर यांनी केली आहे.
   विरेंद्र म्हात्रे हे राष्ट्रीय बाल आणि महिला विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे जॉइंट सेक्रेटरी आणि लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक/अध्यक्ष आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते समाजसेवा करत असून अतिशय कष्टातून आणि शून्यातून वाटचाल करत म्हात्रे यांनी आपला समाजसेवा वाढवला आहे. यात लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई च्या सदस्य यांची चांगली साथ लाभत आहे. त्यांचा हा समाजसेवेतील ठसा नवी मुंबई व महाराष्ट्राबाहेरही विस्तारला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...