आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

बृहन्मुंबई क्षेत्रात फटाके वाजविण्यास ३१ जानेवारीपर्यंत मनाई

 मुंबई, दि. ५ : बृहन्मुंबई क्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी फटाके विक्रीसह फटाके जवळ बाळगणे, हस्तांतरण करणे, प्रदर्शन करणे आणि वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. बृहन्मुंबई पोलीस दलातील अभियान शाखेचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले आहेत. दि.३१ जानेवारीपर्यंत आदेश लागू राहतील.

नववर्षानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत असल्याने अन्य नागरिकांना होणारा अडथळा, गैरसोय, धोका किंवा अन्य प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी फटाक्यांवर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत.

या ठिकाणी फटाके वाजविण्यास मनाई

दि.३१ जानेवारीपर्यंत ५०० मीटर बॉटलिंग प्लांटच्या बफर झोनसोबतच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.च्या परिमितीतील व बाहेरील क्षेत्र, बॉटलिंग प्लांट बफर झोन, माहूल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, स्पेशल ऑइल रिफायनरीच्या १५ आणि ५० एकर क्षेत्र अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडवू किंवा फेकू नये, असे आदेश, उपायुक्त श्री. ठाकूर जारी केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !!

मुंबई ( प्रतिनिधी) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरीक सेवा, महाराष्ट्र यांच्या *वर्धापन दिनानिमित्त* तसेच *राजर्षी छत्र...