मुंबई - कोकणच्या लाल मातीतील कैक वर्षे कोकणच्या कलावंतांनी जतन-संवर्धन केलेली कोकणची समृद्ध लोककला जाखडी नृत्य ( शक्ती-तुरा ) या बहुप्रिय कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील लौकिक असणाऱ्या श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे करण्यात आले आहे.चिपळूण सुपुत्र शक्तीवाले शाहीर शाहिद खेरटकर विरुद्ध तुरेवाले शाहीर सचिन धुमक ( ढाकमोली ) यांची पाहण्यासारखी जुगलबंदी रंगणार आहे.मनोरंजन,प्रबोधन,काव्य-संगीत यांचा संगम असणारा कार्यक्रम आज शनिवार दि.२५ जून २०२२ रोजी रात्रौ ०८ : ३० वा.दामोदर नाट्यगृह परळ ( मुंबई ) येथे पार पडणार आहे.या सोहळ्याला कोकणातील अनेक शाहीर वर्ग,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून,रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी रमेश कोकमकर - ९७७३७४६८२२,रमेश भेकरे - ९५९४३५२८६३ यांच्याशी संपर्क साधावा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम
मुंबई (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा