अलिबाग (जिमाका):- येथील तहसिल कार्यालयात (दि.22 जून 2022) रोजी तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेच्या समितीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीस अध्यक्ष प्रकाश पाटील, श्रीमती दक्षता राऊत, श्री.हेमनाथ खरसांबळे, श्री.पंडीत ढमढेरे इत्यादी सदस्य व गटविकास अधिकारी श्री.विजय नलावडे, मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी श्रीमती माने, नायब तहसिलदार संजय गांधी योजना, श्रीम.मानसी पाटील तसेच कर्मचारी उपस्थित होते.
तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करून संजय गांधी निराधार योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीमध्ये सर्व प्राप्त अर्जांची पडताळणी करून समिती सदस्यांनी विधवा महिला 6, दिव्यांग 3 असे एकूण 9 अर्ज मंजूर केले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा