आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

साईभूमी चाळ रहिवाशी संघ,( नालासोपारा ) तर्फे विविध कार्यक्रम संपन्न !

मुंबई - (  दिपक कारकर)उपरोक्त रहिवाशी संघातर्फे सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण पूजा निमित्त विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले.दरम्यान महिलांसाठी हळदी कुंकू,रांगोळी स्पर्धा,क्रिकेट स्पर्धा,मनोरंजन खेळ,आदी उपक्रम घेण्यात आले होते.या उपक्रमात सहभागी व विजेत्या स्पर्धकांना चाळ कमिटीतर्फे आकर्षक बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

   या सोहळ्याला प्रमुख पाहुणे  सचिनदादा देसाई ( नगरसेवक ), चंद्रकांत दादा हातीम,( ,सर्वेसर्वा - साई कन्ट्रक्शन ),संतोषदादा किर्वे,राजनदादा किणी,यांनी उपस्थिती दाखविली.तसेच  चाळीतील सर्व सभासद/महिला वर्ग व बाजूच्या १३ चाळीतील अध्यक्ष व सर्व मंडळी उपस्थित होती.साईभूमी चाळ अध्यक्ष-विनोद शितप, सचिव-अरविंद डावल, खजिनदार-समीर धावडे, कार्याअध्यक्ष-दिलीप जोशी व सदस्य व समस्त कमिटीतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपत,विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या साईभूमी चाळ कमिटीतर्फे राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदनासह कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम

मुंबई  (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...