बदलापूर(गुरुनाथ तिरपणकर)- स्त्रीच लग्न झाल की ती माहेराहुन सासरी जाते.नविन घर जरा जुळवून घेण्यात वेळ जातो,मग सासुरवाशिण होते.वर्षानुवर्षे जातात,माहेरी जाण क्वचित होत.काही अनंत अडजणींमुळे माहेरपणाचा आनंद घेता येत नाही.पण आता माहेरपणासाठी येणा-या महिलांसाठी भारतातील पहिल हक्काचे माहेरघर(माहेरवाशिण)बदलापूर शहरात प्रभाताई शिर्के यांनी उभारलेल आहे.ब-याच महिला येथे माहेरपणासाठी येतात.गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे वैद्यकीय यंत्रणा हतबल झालेली आहे,सर्व हाॅस्पिटल मधील परिचारिका या आपला जीव धोक्यात घालुन काम करत आहेत.त्यांना थोडाफार विरंगुळा मिळावा, आनंद मिळावा,त्यांच माहेरपण आपण कराव या उद्देशाने"माहेरवाशिण"च्या संस्थापिका प्रभाताई शिर्के यांनी मुंबईतील ॠग्णालयातील महिला हेड इनचार्ज,परिचारिका यांना माहेरपणासाठी आमंत्रित केले होत.डी.एन.हाॅस्पिटल,सिध्दार्थ हाॅस्पिटल,नायगाव मॅटर्निटी,क्रांतीबाई सावित्रीबाई फुले या हाॅस्पिटलच्या ३५नर्सेस माहेरपणासाला आल्या होत्या.त्यांच स्वागत भाकरतुकडा अंगावरुन काढत,कुंकुमतिलक ओवाळणी करत,साग्र संगितात आपल्या माहेरच्या घरात प्रभाताई शिर्के यांनी स्वागत करत सर्वांचा घर प्रवेश केला.थोडा वेळ उसंत घेत खेळ खेळण्याची,गाणी म्हणण,संगीताच्या तालावर नाचण,मनमुराद घसण-खिदळण हे सर्व भान विसरून या सर्व परिचारिका आनंद घेत होत्या.प्रभाताई त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालत होत्या.त्यांच्या पसंतीच जेवण त्यांना देण्यात आले.सर्वांना सुग्रास जेवणाचा आनंद घेतला.प्रभाताईंनी सर्वांच आदरातिथ्य आईसारखच केल.माया,ममता,करुणा,आनंद या परिचारीकेंच्या चेह-यावरून ओसंडून वाहत होता. गप्पा-टप्पांचा फड रंगला होता.प्रत्येकाने या माहेर घरात आपली हौस भागवुन घेतली. सर्व नर्सेसच्या डोळ्यातील हसु आणि आसु प्रकर्षाने जाणवत होत.माहेरपणाला आल्यान जीवनाच सार्थक झाल,अशी भावना सर्वांची होती.प्रभाताईंच प्रेम,आईचा आशिर्वाद,आचार-विचारांची देवाण घेवाण, प्रफुल्लित होणार आनंदी कौटुंबिक वातावरण याचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला.शेवटी घरी जाण्याची वेळ येते तेव्हा,सर्वांच्या डोळ्यात अश्रु तराळले.प्रभाताईंनी केलेल माहेरपण उराशी बाळगून जड अंतःकरणाने माहेर घराचा(माहेरवाशिण)निरोप घेतला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर सन्मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव..!
मुंबई( महेश्वर भिकाजी तेटांबे): संकटांवर मात करून शिक्षणाच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा