आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडेरेशनची नाशिक येथे पत्रकार परिषद

 

नाशिक- जागतिक मानव अधिकार सुरक्षा  फेडेरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र आहेर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नाचा उलघडा केला आहे, जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडेरेशनचे काही पदाधिकारी आपल्या पदाचे दुरुपयोग करीत अनेक प्रकारचे फेडेरेशन बद्दल अफवा आणि इतर पदाधिकाऱ्यांना गुमराह करत गैरसमज पसरवत  होते त्यांना  फेडेरेशन मधून बडतर्फ करण्यात आले आहे असे फेडेरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र आहेर साहेब जाहीर केले आहे.

   जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडेरेशनच्या सर्व नियम अटी समजावून सांगत सर्व व्यवहार हा पारदर्शक आणि पूर्ण फेडेरेशनच्या कायद्याचे पालन करून चालू आहे असे सूचित केले, या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टीचा पूर्ण महत्वपूर्ण माहिती देण्यात जमलेल्या पत्रकारांना देण्यात आली. 
जागतिक मानव अधिकार सुरक्षा  फेडेरेशनचे राष्ट्रीय  कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट गजानन दामोदर ठाकरे यांनी फेडेरेशन बद्दल अतिशय उपयुक्त माहिती सर्व ओरिजिनल पेपर्स सहित दाखवत फेडेशनचे सर्व पेपर्स वेबसाइट आणि नेटवर आहेत कोणालाही काही शंखा असल्यास त्यांनी ते पडताळून पाहावे असे पत्रकारांना माहिती दिली.
    सौ.पल्लवी यांनी प्रत्येक फेडेरेशनच्या कागदपत्रांची सविस्तर उपयुक्त माहिती पत्रकारांना दिली 1),रजिस्ट्रेशन केल्याची ओरिजिनल प्रत, 2) फेडरेशनचा लोगो खरीदी केल्याची प्रत, 3)  ISO प्रमाण पत्र व ते कसे  मिळाले याची माहिती, 4) फेडरेशन चे a/c सोबत 1500 का व कशासाठी घेतले जातात याची माहिती, 5) VIP का वापरले जातेयाची माहिती दिली,  यावेळी फेडेरेशनचे नवनीत पाटील उत्तर महाराष्ट्र सहसचिव,श्री.पंकज महादेव शिंपी महाराष्ट्र सह उपाध्यक्ष,श्री ज्ञानेश्वर मुकादम, श्री.अविनाश म्हात्रे ठाणे जिल्हा सचिव, सौ.नीलम बराई डोंबिवली शहर उपाध्यक्ष, श्री.मनोज सावंत   डोंबिवली शहर अध्यक्ष, सरदार मुत्सफा झाकीर नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, सौ.कलाबाई शिरसाट जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष असे अनेक पदाधिकारी उपस्तित होते या सर्व पदाधिकारी यांनी फेडेरेशनला आणि राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र आहेर साहेब यांना पूर्ण सहकार्य आहे असे  जाहीर केले.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर सन्मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव..!

मुंबई( महेश्वर भिकाजी तेटांबे): संकटांवर मात करून शिक्षणाच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली ...