आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

मुरबाडच्या कन्येचे सुयश,जव्हारलाल नेहरु सेंटर बँगलोर येथे शास्त्रज्ञ पदावर कार्यरत

मुंबई (शांताराम गुडेकर)
                   तालुक्यातील टोकावडे सारख्या ग्रामिण भागातील कन्या डाॅ.दीशा रमेश भांगे हीने माडर्न काॅलेज पुणे येथून बीटेक , आय आय टी पवई येथून एमटेक , व पीजीडीईएम लंडन युनिव्हरसिटी येथून पूर्ण करुन , इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोर फेलोशिप मिळवली आहे .
         मुरबाडच्या टोकावडे गावचे रहिवासी भारतिय कम्युनिष्ट पक्षाचे तत्कालिन चिटणिस कै.काॅम्रेड रमेश भांगे  यांची कन्या व  टोकावडे गावचे माजी सरपंच पञकार राजेश भांगे यांची पुतणी, युवा सामाजिक कार्यकर्ता  महेश भांगे व न्यूज रिपोर्टर बाळा भांगे यांची बहीण डाॕ.दिशा रमेश भांगे हिने अथक परिश्रम  करुन  माॕडर्न काॕलेज पुणे येथून बीटेक , आय आय टी पवई  येथून एमटेक व  पीजीडीईएम ईन लंडन युनिव्हर्सिटी येथून पुर्ण करुन इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोरची फिलो शिप मिळवली आहे.
     सध्या जव्हारलाल नेहरु सेंटर बँगलोर येथे शास्ञज्ञ (scientist)पदावर कार्यरत  असून 
HIV एडस् या आजारावर विविध देशामध्ये अध्ययन करुन हा विषाणू जगभर कसा पसरला यावर शोधप्रबंध लिहला आहे.ती काही दिवसांत मायदेशी परतणार असुन या,गुणवंत डाॕ.दिशा रमेश भांगे हीचे कुणबी समाज संघटना मुरबाड व ग्रामस्थ मंडळ टोकावडे यांच्यावतीने सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे.तीच्या या यशाबद्दल तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!

मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...