मुंबई : मराठी पत्रकारितेतील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्तने राज्यात 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो.या दिवसाचे औचित्य साधून पनवेल येथील पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम गुरुवार दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२:३० पर्यंत शासकीय विश्रामगृह,चार फाटा ,डाऊर नगर उरण,नवी मुंबई या ठिकाणी पार पाडणार आहे. हा कार्यक्रम मा. भाऊसाहेब खंदारे -तहसीलदार, उरण ,मा. सुनील पाटील- वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण,मा. मृत्युंजय कुमार पांडे- प्राचार्य सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज यांच्या शुभहस्ते तसेच उरण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मा . घनश्याम कडू व कार्याध्यक्ष संजय गायकवाड , विजय कडू-संपादक दैनिक वादळवारा,मा. सुधीर शर्मा-संपादक टीव्ही वन इंडिया या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम मर्यादित संख्येने तसेच कोरोना नियमांचे पालन करून होणार आहे. तेव्हा सदर कार्यक्रमास सर्वानी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन समिती अध्यक्ष डॉ .अशोक म्हात्रे यांनी केले आहे .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
छावा संस्थेकडून वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम
पेण ( पी.डी.पाटील) सोमवार दि. ३० जून २०२५ रोजी छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संघटना यांच्याकडून ...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या सं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा