आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी प्रतिबंधक लसीचा 'प्रिकॉशनरी' डोस देण्यास सुरूवात ; पहिल्या दिवशी 1 हजार 46 लाभार्थ्यांनी घेतला 'प्रिकॉशनरी' डोस

अलिबाग (जिमाका):- जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा 'प्रिकॉशनरी' डोस देण्यास सुरूवात झाली आहे. या मोहिमेची सुरूवात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या उपस्थितीत रायगड पोलीस मुख्यालय येथे करण्यात आली.

     शासनाच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यामध्ये  दि.10 जानेवारी, 2022 रोजी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा 'प्रिकॉशनरी' डोस देण्यास सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यात सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत 1 हजार 46 लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा 'प्रिकॉशनरी' डोस देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.वंदन पाटील यांनी कळविली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक...