आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

माजी पंतप्रधान , भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त "काव्यांजली कार्यक्रम" उस्फुर्त प्रतिसादात संपन्न

वेंगुर्ला  - येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान  भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काव्यांजली या कार्यक्रमातून त्यांच्या कवितांचे अभिवाचन करून अनोखी श्रद्धांजली देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाड़्मय मंडळ, बॅ. खर्डेकर महाविद्यालय, वेताळ प्रतिष्ठान, किरात ट्रस्ट, नगरवाचनालय इत्यादी संस्थांचा सहभाग होता. कॅम्प येथील घोडेबाव गार्डनमध्ये  खुल्या रंगमंचावर झालेल्या काव्यांजली या कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला.  लेखिका वृन्दा काम्बळी व किरातच्या संपादिका सीमा मराठे यांच्या ओघवत्या भाषेतील निवेदनाने कार्यक्रमाला रंगत आणली. यातील कवितांची निवड व कवितेतील आशयाला पूरक अशा निवेदनातील लेखन वृन्दा काम्बळी  यानी केले होते. 

      प्रथम नगराध्यक्ष  राजन गिरप व विश्व हिंदु परिषदेचे प्रांताचे सेवा प्रमुख डाॅ. राजन शिरसाठ यांच्याहस्ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या  प्रतिमेला पुष्पहार  घालून  उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,उपनगराध्यक्षा  शीतल आंगचेकर ,  तालुकाध्यक्ष  सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका साक्षी पेडणेकर व कृपा मोंडकर, महिला मोर्चाच्या वृन्दा  गवंडळकर,  बुथप्रमुख नितीश कुरतडकर , ओंकार चव्हाण  इत्यादी तसेच अनेक  काव्यरसिक उपस्थित होते. 

     उत्तरोत्तर रंगत गेलेल्या काव्यांजली या कार्यक्रमात कवितांचे वाचिक अभिनयातून केलेले उत्तम सादरीकरण आणि कार्यक्रमाला एका सूत्रात गोवणारे ओघवते निवेदन ही वैशिष्ट्ये होती. शैलेश जामदार, पांडुरःग कौलापुरे,  प्रतिक्षा भगत, प्रा. पी. जी. देसाई, फाल्गुनी नार्वेकर, वासूदेव पेडणेकर, प्रा. आनंद बांदेकर,  संजय पाटील, संजय पुनाळेकर,  अवधूत नाईक,  अजित राऊळ, कैवल्य पवार, प्राजक्ता आपटे, महेश बोवलेकर, प्रा. सुरेखा देशपांडे, डाॅक्टर पूजा कर्पे, स्वप्नील वेंगुर्लेकर,  राजश्री परब, इत्यादीनी कवितांचे अभिवाचन केले. पि. के. कुबल व आदित्य  खानोलकर  यानी अटलजींवरील स्वरचित कविता सादर केली. 

     डाॅ.  राजन शिरसाट यानी मनोगत व्यक्त केले.  नगरसेवक प्रशांत  आपटे यानी शेवटी आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !

मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...