कार्यक्रमाची सुरुवात कुळवाडी भूषण रयत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली.उपस्थित मान्यवरांनी नवजागृत ग्रुप च्या सर्व युवा कार्यकर्त्याना मोलाचं असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शैलेश दळवी यांनी केले. कार्यक्रमाला साईभक्त नवजागृत ग्रुप चे सर्व कार्यकर्ते खूप तळमळीने मेहनत घेतली.त्या सर्वांचे आभार मानण्यात आले तसेच ज्यांनी या दिनदर्शिकेस जाहिराती दिल्या अशा जाहिरातदारांची नावे वाचून त्यांचे देखील आभार मानण्यात आले.व सर्व उपस्थित मान्यवरांचे कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि साईभक्त नवजागृत ग्रुप चा उत्साह द्विगुणित केला त्या बद्दल आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
बुधवार, २९ डिसेंबर, २०२१
साईभक्त नवजागृत ग्रुप, कासार कोळवणचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा ; युयुत्सु आर्ते आणि मराठी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत काब्दुले यांची प्रमुख उपस्थिती
कोकण (शांताराम गुडेकर/मोहन कदम ) रत्नागिरी जिल्हामधील संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण गावच्या श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ पुरस्कृत साईभक्त नवजागृत ग्रुप, कासार कोळवण या तरुण मुलांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनेच्या दिनदर्शिका २०२२ चा प्रकाशन सोहळा साई मंदिर , कासार कोळवण येथे सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुत्सु आर्ते आणि मराठी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेते श्री. प्रशांत काब्दुले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी कासार कोळवण गावच्या सरपंच सौ.मानसी करंबेळे, कुणबी युवा संगमेश्वरचे सेक्रेटरी कु. वैभव तोरस्कर , ग्रा.पं. सदस्या सौ.वनिता करंबेळे, सौ.श्रद्धा करंबेळे, सौ.दीक्षिती करंबेळे,पोलीस पाटील श्री. महेंद्र करंबेळे, जेष्ठ नागरिक श्री.शंकर तोरस्कर,श्री राजाराम करंबेळे,श्री.तुकाराम करंबेळे , श्री. रोशन कदम आणि गावातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच कासार कोळवण ग्रामस्थ उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा