आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

खासदारांच्या रूपाने कल्याण डोंबिवली परिसरात विकासाचे भगवे वादळ

कल्याण : कल्याण लोकसभा परिक्षेत्रात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकासाभिमुख कामांचा प्रचंड वेग पाहून तसेच त्याला होणारी पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची साथ आणि महाराष्ट्र राज्य आघाडी सरकारचे खंबीर असे नेतृत्व मा.उद्धव साहेब ठाकरे त्यांच्या कामावर विश्वास ठेवून काल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपाचे तीन तरुण तडफदार नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला, यातीन नगरसेवकांपैकी एक असलेल्या डॉक्टर सुनीताताई पाटील यांची तब्येत ठीक नसल्यामुळे पक्ष प्रवेश सोहळ्यास काल त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या, आज प्रत्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे नगरसेविका डॉक्टर सुनीताताई पाटील यांचे डोंबिवली स्थित घरी उपस्थित राहून त्यांचा यथायोग्य सन्मान केला व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, याप्रसंगी नगरसेविका डॉक्टर सुनीताताई पाटील यांच्या समर्थकांनी खासदार डॉक्टर शिंदे यांचे मार्फत पक्षाचे भगवे बंधन हातावर बांधून शिवसेना पक्षात प्रवेश घेतला... याप्रसंगी काही नागरी प्रश्नांवर चर्चा झाली व त्या प्रश्नांना लवकरच सोडविण्याचे आश्वासन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले... या वेळी शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, बंडू पाटील, युवा सेना डोंबिवली चार अधिकारी सागर जेधे, नगरसेवक महेश गायकवाड, कोणी माझी सरपंच ठोंबरे, कल्याण पंचायत समितीचे उपसभापती ग्रामीण विभागातील प्रमुख पदाधिकारी यांचेसह नगरसेविका डॉक्टर सुनीताताई पाटील यांचे असंख्य समर्थक उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...